Breaking : दहावी बारावीचे वेळापत्रक जाहीर; वाचा कधी होणार परीक्षा

महत्वाचे म्हणजे दहावी आणि बारावीच्या परीक्षा या ऑफलाईन पद्धतीने पार पडणार आहेत.
hsc ssc board
hsc ssc board saamtv
Published On

मुंबई : राज्यातील दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विटरद्वारे ट्विट करून दिली आहे. शिक्षणतज्ज्ञांशी विचारविनिमय करून हे वेळापत्रक तयार करण्यात आल्याचे गायकवाड यांनी सांगितले. उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र (HSC) व माध्यमिक शाळा प्रमाणपत्र (SSC) च्या परीक्षा मार्च महिन्यात होणार आहेत. ४ मार्च २०२२ ते ७ एप्रिल २०२२ दरम्यान बारावीची लेखी परीक्षा होणार असून १५ मार्च २०२२ ते १८ एप्रिल २०२२ दरम्यान दहावीची लेखी परीक्षा पार पडेल.

महत्वाचे म्हणजे दहावी आणि बारावीच्या परीक्षा (Exam) या ऑफलाईन (Offline) पद्धतीने पार पडणार आहेत. कोरोना काळात २५ टक्के अभ्यासक्रम कमी करण्यात आला असल्याकारणाने उर्वरित ७५ टक्के अभ्यासक्रमावरच प्रश्न विचारले जाणार असल्याचे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान, दहावीची प्रात्यक्षिक, श्रेणी व तोंडी / अंतर्गत मूल्यमापन परीक्षा २५ फेब्रुवारी ते १४ मार्च दरम्यान पार पडेल. तर, बारावीची प्रात्यक्षिक, श्रेणी व तोंडी / अंतर्गत मूल्यमापन परीक्षा १४ फेब्रुवारी ते ३ मार्च या कालावधी दरम्यान पार पडणार आहे.

दोन्ही वर्गांच्या परीक्षा कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोर पालन करून पार पडतील. बाराचीचा निकाल (Result) जून २०२२ च्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत आणि दहावीचा निकाल जुलै २०२२ च्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत जाहीर करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. विद्यार्थ्यांचे आरोग्य, सुरक्षितता हि आमची प्राथमिकता असून विद्यार्थ्यांना सुरक्षित व पोषक वातावरण प्रदान करण्यासाठी याअगोदर परीक्षा वेळापत्रक, पद्धतीबद्दल राज्यभरातील शाळा, मुख्याध्यापक, शिक्षक व मूल्यांकनासंदर्भातील तज्ज्ञांसोबत विस्तृत चर्चा करून त्यांच्या मौल्यवान सूचनांचा या सर्व प्रक्रियेत समावेश करण्यात आला असल्याचे वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी सांगितले.

Edited By : Krushnarav Sathe

SSC Time Table
SSC Time Table
HSC Time Table
HSC Time Table

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com