Uddhav Thackeray : ठाकरे गटाचा 'सूर्योदय' होणार? हे निवडणूक चिन्ह मिळण्याची दाट शक्यता

निवडणूक आयोगाने शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह गोठवल्यानंतर ठाकरे गटाने चिन्हासाठी निवडणूक आयोगाकडे तीन पर्याय दिले होते.
CM Uddhav Thackeray Latest News
CM Uddhav Thackeray Latest NewsSaam Tv
Published On

शिवाजी काळे, साम टीव्ही

Uddhav Thackeray News Election Symbol : राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येतेय. अंधेरी पोटनिवडणूकीसाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या गटाला उगवता सूर्य हे चिन्ह मिळण्याची दाट शक्यता आहे. निवडणूक आयोगाने शिवसेनेचं (Shivsena) धनुष्यबाण हे चिन्ह गोठवल्यानंतर ठाकरे गटाने चिन्हासाठी निवडणूक आयोगाकडे तीन पर्याय दिले होते. यातील उगवता सूर्य हे निवडणूक चिन्ह ठाकरे गटाला मिळण्याचा दाट शक्यता आहे.

CM Uddhav Thackeray Latest News
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय; EC विरोधात आता हायकोर्टात जाणार

आगामी अंधेरी पोटनिवडणूकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे चिन्हासाठी तीन पर्याय सूचवले आहे. यामध्ये त्रिशूल, मशाल, आणि उगवता सूर्य या चिन्हांचा समावेश आहे. यातील त्रिशूल हेच ठाकरे गटाला हवं आहे. पण धार्मिक चिन्हावरून याआधीच सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला नोटीस बजावली आहे. (Maharashtra News)

त्यामुळे त्रिशूळ हे चिन्ह ठाकरे गटाला मिळण्याची शक्यता कमी आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाकडून त्रिशूल ऐवजी ठाकरे गटाला उगवता सूर्य हे निवडणूक चिन्ह मिळणार असल्याची दाट शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ठाकरे गटाने आता उगवता सूर्य या चिन्हाला 'सूर्योदय' असं संबोधलेलं आहे आणि हे चिन्ह आपल्याच मिळेल असा दावा केलाय.

CM Uddhav Thackeray Latest News
Dhananjay Munde : त्यांनी मला चकली देऊन राष्ट्रवादीत आणलं; धनंजय मुंडे काय म्हणाले, वाचा...

केंद्रीय निवडणूक आयोगाने शनिवारी शिवसेना नावासह धनुष्यबाण चिन्ह गोठवलं. त्यामुळे शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटांना आता शिवसेना हे नाव व धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह वापरता येणार नाही. अशातच दोन्ही गटाकडून नवीन चिन्हासाठी निवडणूक आयोगाकडे अर्ज करण्यात आले आहेत.

उद्धव ठाकरे गटाने निवडणूक आयोगाला त्रिशूळ, उगवता सूर्य आणि धगधगती मशाल हे चिन्हांचे तीन पर्याय दिले आहेत. शिंदे गटाकडून त्रिशूळ, उगवता सूर्य आणि गदा हे पर्याय देण्यात आले आहेत. दरम्यान, ठाकरे गटाने आपल्या नवीन निवडणूक चिन्हाला उगवता सुर्य नाही तर अंधाराच्या विरोधात नवा सुर्योदय आहे, असं देखील संबोधलं असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com