Dhananjay Munde : त्यांनी मला चकली देऊन राष्ट्रवादीत आणलं; धनंजय मुंडे काय म्हणाले, वाचा...

धनंजय मुंडे यांनी मंत्री रावसाहेब दानवे, विरोधीपक्षनेते अंबादास दानवे आणि मंत्री संदीपान भूमरे यांच्यावर मिस्कील टोला देखील लगावला.
Dhananjay Munde
Dhananjay MundeSaam tv
Published On

Dhananjay Munde News : 'मी जेव्हा भाजपमध्ये (BJP) होतो, तेव्हा मी भैय्यासाहेबांना (अमरसिंह पंडितांना) चकली देऊन भाजपमध्ये नेलं आणि ते आमदार झाले. त्यानंतर भैय्यासाहेबांनी (अमरसिंह पंडितांनी) मला चकली देऊन राष्ट्रवादीत आणलं, मी आमदार झालो', असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी भाजप-राष्ट्रवादीत येण्या जाण्याचा किस्सा सांगितला. (Dhananjay Munde News Today)

Dhananjay Munde
Sanjay Raut : संजय राऊतांची सुटका होणार? आज जामीन अर्जावर सुनावणी

बीडच्या गेवराईमध्ये राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत आयोजित, माजी मंत्री शिवाजीदादा पंडित यांच्या 85 व्या अभिष्ठचिंतन सोहळ्यानिमित्त कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी धनंजय मुंडे यांनी मंत्री रावसाहेब दानवे, विरोधीपक्षनेते अंबादास दानवे आणि मंत्री संदीपान भूमरे यांच्यावर मिस्कील टोला देखील लगावला. (Maharashtra News)

काय म्हणाले धनंजय मुंडे?

'आजवर मी अनेक मान्यवरांचे भाषणं ऐकली, तशी ती वाचली होती, तसं काही कुणाच्या भाषणांवर बोलायचं नाही, इथं सगळेच आलेले आहेत. म्हणजे सत्तेत असलेले दानवे साहेब देखील आलेले आहेत. आणि विरोधीपक्षात असलेले दानवे साहेब सुद्धा आलेले आहेत, म्हणजे हे दोघेही वन-वे आहेत'. असं म्हणत त्यांनी यावेळी दोन्ही दानवेंवर मिस्कील भाष्य केलं.

Dhananjay Munde
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय; EC विरोधात आता हायकोर्टात जाणार

पुढे बोलतांना धनंजय मुंडे म्हणाले की, 'याठिकाणी भुमरे साहेब सुध्दा आलेले आहेत. मात्र विरोधीपक्षनेते दानवे साहेब आणि भुमरे साहेब या दोघांना जावं लागलं. आता स्वाभाविक आहे, की रोजगार हमीचं मंत्रिपद त्यांच्याकडे असल्यामुळे, जास्त वेळ कुठंही एका ठिकाणी बसता येणं शक्य नाही. मात्र ते देखील याठिकाणी अभिष्ठनचिंतन करायला इथं आले'.

'सर्वांचे भाषण ऐकल्यानंतर माझ्या लक्षात आलं, कदाचित प्रत्येकांच्या कार्यालयातून दादांच्या बाबतीत एक वाक्य देखील वेगळं लिहिलेलं नाही, तशाला तशी स्क्रिफ्ट आहे'. असं देखील धनंजय मुंडे म्हणाले. त्यामुळं हा त्यांचा रोख कुणाकडे ? असा सवाल देखील समोर आलाय.

'माझ्या दृष्टीने दादांची खासियत काय ? माझ्या दृष्टीने दादांना हा महाराष्ट्र भीष्मपितामह का म्हणतो ?. तर एकदा का दादांनी टोपी कुणाच्या विरोधात काढली तर पुन्हा तो माणूस उठता नहीं. असं म्हणत धनंजय मुंडेंनी जोरदार फटकेबाजी केली. दरम्यान दादांचे एक स्वप्न अधुरे आहे, ते आपण विजयराजेंना 2024 च्या निवडणुकीत निवडून देऊन पूर्ण करू. तेव्हाच खऱ्या अर्थाने दादांच्या अभिष्ठचिंतन सोहळ्याच्या शुभेच्छा ठरतील'. असं आवाहन देखील यावेळी धनंजय मुंडे यांनी केलं.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com