Uddhav Thackeray : संजय राऊत यांना पुन्हा अटक होऊ शकते? उद्धव ठाकरे असं का म्हणाले?

शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार तसेच प्रवक्ते संजय राऊत यांना काल पीएमएलए कोर्टाने जामीन दिला.
Uddhav Thackeray On Sanjay Raut
Uddhav Thackeray On Sanjay RautSaam TV
Published On

Uddhav Thackeray On Sanjay Raut : शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार तसेच प्रवक्ते संजय राऊत यांना काल पीएमएलए कोर्टाने जामीन दिला. तब्बल १०३ दिवसांनंतर राऊत यांची जेलमधून सुटका झाली. सुटकेनंतर आज संजय राऊत (Sanjay Raut) हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी मातोश्रीवर गेले. मातोश्रीच्या अंगणात आदित्य ठाकरेंनी मिठी मारून राऊतांचं स्वागत केलं. दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्यासह संजय राऊत यांनी पत्रकारपरिषद घेतली. (Uddhav Thackeray News Today)

Uddhav Thackeray On Sanjay Raut
Sanjay Raut : राज ठाकरेंच्या 'त्या' टीकेला संजय राऊतांचं प्रत्युत्तर; म्हणाले, माझी अटक…

या पत्रकारपरिषदेत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी संजय राऊत यांच्या धाडसाचं कौतुक केलं. संजय राऊत यांच्या जामिनानंतर आनंदानंतर दुसरी प्रतिक्रिया असू शकत नाही. संजय राऊत हे शिवसेनेचे नेते आहे, खासदार आहे, सामनाचे संपादक आहे, आणि माझे जीवलग मित्रही असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, 'मित्र तोच असतो, जो संकटाच्या काळामध्ये न डगमगता लढत असतो, साथ देतो तसे माझे राऊत मित्र आहे. काल जो न्यायदेवतेने निकाल दिला आहे त्याचे मी आभार मानतो. पण या निकालपत्रात न्यायालयाने काही परखड निरीक्षणे सुद्धा नोंदवली आहे. त्यामुळे हे जगजाहीर झाले की केंद्रीय यंत्रणा या केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर चालत आहे'.  (Maharashtra News)

Uddhav Thackeray On Sanjay Raut
Shivsena : संजय राऊतांनंतर ठाकरे गटाचा बडा नेता अडचणीत; कोर्टाने बजावलं समन्स

'भाजपने आजवर केंद्रीय यंत्रणेचा दुरूपयोग देऊन अनेक पक्ष फोडले आहे, अजूनही काही पक्ष फोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यासाठी अनेक खोट्या केसेस केल्या जात आहे. अनेक नेत्यांना तुरूंगात टाकलं जात आहे. मात्र, काल न्यायालयाने केंद्र सरकारला दणका दिल्यानंतरही कदाचित कुठल्यातरी खोट्या केसेसमध्ये परत संजयला (संजय राऊत) गोवण्याचा प्रयत्न होऊ शकेल', असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. (Sanjay Raut Latest News)

'मागील ८-१५ दिवसांमधील केंद्रीय कायदामंत्री रिजूजू यांची वक्तव्य आता केंद्र सरकार न्याय देवतेलाही आपल्या नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहे की काय असं दाखवणारी आहेत. त्यांनी न्यायवृदांवरच शंका उपस्थित केली आहे. एकूणच सर्वसामान्यांच्या आशेषा किरण न्यायालय असते. केंद्र सरकार न्यायालयालाच आपल्या बुडाखाली घेण्याचा प्रयत्न करत असेल, तर देशातील तमाम जनतेने त्याचा विरोध केला पाहिजे', असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com