Sanjay Raut : राज ठाकरेंच्या 'त्या' टीकेला संजय राऊतांचं प्रत्युत्तर; म्हणाले, माझी अटक…

आज राऊत यांनी मुंबईत माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामांचं कौतुक केलं.
Raj Thackeray, Sanjay Raut
Raj Thackeray, Sanjay RautSaam Tv
Published On

Sanjay Raut vs Raj Thackeray : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची तब्बल १०३ दिवसानंतर बुधवारी (९ नोव्हेंबर) जेलमधून सुटका झाली. जेलमधून सुटका होताच, आज राऊत यांनी मुंबईत माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामांचं कौतुक केलं. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेलाही प्रत्युत्तर दिलं आहे.

Raj Thackeray, Sanjay Raut
Sanjay Raut : संजय राऊत घेणार मोदी, शहांची भेट; काय आहे कारण? वाचा...

काही महिन्यांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी ठाण्यातील एका कार्यक्रमात बोलताना संजय राऊत यांच्यावर टीका केली होती. संजय राऊत यांनी आता एकांतात बोलण्याची प्रॅक्टिस करावी, असा खोचक सल्ला त्यांनी राऊतांना दिला होता. आज राज ठाकरे यांनी दिलेल्या या सल्ल्याला संजय राऊत यांनी प्रत्त्युत्तर दिलं आहे.

काय म्हणाले संजय राऊत?

“मनसे प्रमुख आणि माझे मित्र राज ठाकरे हे संजय राऊत यांनी एकांतात बोलण्याची सवय लाऊन घ्यावी, असे ते म्हणाले होते. त्यावर मी त्यांना एवढंच सांगेल, की मी कारागृहात एकांतात होतो. वीर सावरकरही तुरुंगात असताना एकांतात होते. लोकमान्य टिळक तसेच आणीबाणीच्या काळात अनेक नेते एकांतात होते. तशीच माझी अटकही राजकीय होती. मी माझा एकांतातला काळ सत्कर्मी लावला आहे, असे प्रत्युत्तर संजय राऊत यांनी दिले. (Maharashtra News)

Raj Thackeray, Sanjay Raut
Shivsena : संजय राऊतांनंतर ठाकरे गटाचा बडा नेता अडचणीत; कोर्टाने बजावलं समन्स

देवेंद्र फडणवीसांचं केलं कौतुक

'मी तुरुंगात असताना राज्य सरकारने काही चांगले निर्णय घेतले आहेत. विशेषत: देवेंद्र फडणवीस यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. माझ्या काही कामासंदर्भात मी आता त्यांना भेटायला जाणार आहे', असं म्हणत संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलं आहे.

'मला वाटतं की राज्याचा कारभार देवेंद्र फडणवीस हेच चालवत आहेत. ते अनुभवी नेते आहेत. अलीकडच्या काळात त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण घोषणा केल्या आहेत. आमच्या सरकारने म्हाडाचे अधिकार काढून घेतले होते. ही गोष्ट मला फारशी आवडली नव्हती. पण या सरकारने म्हाडाला पुन्हा अधिकार दिले', असे म्हणत संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांचं कौतुक देखील केलं आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com