Maharashtra Politics : 'उदयनराजे म्हणतात तेच खरे, छत्रपती शिवरायांचा अपमान करणारे सत्तेवर कसे राहू शकतात?’

शिंदे-भाजप सरकारमधील मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विरोधकांवर निशाणा साधत, आता या विषयावर पडदा पडायला पाहिजे असं विधान केलं होतं. त्यांच्या या विधानाचा सामना अग्रलेखातून खरपूस समाचार घेण्यात आला आहे.
Udayanraje Bhosale
Udayanraje BhosaleSaam TV
Published On

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवरायांवर वादग्रस्त विधान केल्याने राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले. विरोधकांसह शिंदे गटातील नेत्यांनीही भाजपवर निशाणा साधत छत्रपती शिवाजी महाराजांवर टीका करणाऱ्या राज्यपालांची हकालपट्टी करा, अशी मागणी केली आहे. अशातच शिंदे-भाजप सरकारमधील मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विरोधकांवर निशाणा साधत, आता या विषयावर पडदा पडायला पाहिजे असं विधान केलं होतं. त्यांच्या या विधानाचा सामना अग्रलेखातून खरपूस समाचार घेण्यात आला आहे. (Maharashtra Politics News)

Udayanraje Bhosale
Maharashtra Vs Karnataka: सीमा भागातील गावांना आकर्षित करण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

'भाजपसह विखे पाटील हे कधीकाळी मर्दमऱ्हाठे मावळे म्हणून शिवरायांचे भक्त होते. आज भाजपात जाऊन त्यांना शिवरायांचा अपमान करणाऱ्या राज्यपालांचे गुणगान करावे लागते. वीर मराठय़ांचा हा देश आहे या कल्पनेस यामुळे धक्का बसतो. एकंदरीत भाजपचे शिवप्रेमाचे ढोंग रोज उघडे पडत आहे. त्यामुळे छत्रपती उदयन राजे म्हणतात तेच खरे की, ‘छत्रपती शिवरायांचा अपमान करणारे सत्तेवर कसे राहू शकतात? हा निर्लजपणाच आहे', अशी टीका सामनातून करण्यात आली आहे.

'गुजरात विधानसभा निवडणुकीत प्रचाराची रणधुमाळी सुरू असताना काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मोदी यांची तुलना शंभर तोंडांच्या रावणाशी करताच मोदी व त्यांच्या लोकांनी लगेच काँग्रेस व खरगेंवर प्रतिहल्ले सुरू केले. मोदींना रावणाची उपमा देणे हा गुजरातचा व गुजरातच्या सुपुत्राचा अपमान असल्याचे जाहीर सभांतून ढोल-नगारे वाजवून सांगण्यात येत आहे'. (Latest Marathi News)

गुजराती जनतेने मोदींच्या अपमानाचा बदला घेतला पाहिजे असे मोदी सांगू लागले. पंतप्रधानांचा अपमान करणे हे चूकच आहे. मात्र जर मोदींना रावण म्हटल्याने गुजराती अस्मितेचा अपमान ठरत असेल तर छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्यांना ‘भाजप’ पाठीशी घालते, त्यांचा बचाव करते यास काय म्हणावे? असा सवाल सामनातून उपस्थित करण्यात आला आहे.

Udayanraje Bhosale
Sushma Andhare : सुषमा अंधारेंची तुफान फटकेबाजी, मुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळावर टीकास्त्र

'चारशे वर्षांनंतर त्या इतिहासावर संशोधन करून आता काय साध्य होणार? आधीच शालेय क्रमिक पुस्तकांतून खरा इतिहास हद्दपार झाला. तेथेच मऱहाठी मनगटे थंड पडली. त्यात आता महाराष्ट्राच्या राज्यपालांपासून मंत्र्या-संत्र्यांपर्यंत प्रत्येकजण स्वतःस महामहोपाध्याय किंवा शिवशाहीर असल्याच्या आविर्भावात डफावर थाप मारीत आहे, पण ही लोणकढी थापच म्हणावी लागेल', असंही सामनातून मांडण्यात आलं आहे.

विखे पाटील हे कधीकाळी मर्दमऱ्हाठे मावळे म्हणून शिवरायांचे भक्त होते. आज भाजपात जाऊन त्यांना शिवरायांचा अपमान करणाऱ्या राज्यपालांचे गुणगान करावे लागते. वीर मराठय़ांचा हा देश आहे या कल्पनेस यामुळे धक्का बसतो. एकंदरीत भाजपचे शिवप्रेमाचे ढोंग रोज उघडे पडत आहे. त्यामुळे छत्रपती उदयन राजे म्हणतात तेच खरे की, ‘छत्रपती शिवरायांचा अपमान करणारे सत्तेवर कसे राहू शकतात हा निर्लजपणाच आहे', असा घणाघात सामनातून भाजपवर करण्यात आला आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com