Sanjay Raut: मेरा यही अंदाज ज़माने को खलता है, संजय राऊतांच नवे ट्विट

मागील काही दिवसात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
Sanjay Raut
Sanjay Raut Saam Tv
Published On

रश्मी पुराणिक

मुंबई: मुंबईच्या (Mumbai) शिवसेना (Shiv Sena) भवनामध्ये पत्रकार परिषद घेऊन भाजपच्या घोटाळ्यांचे खळबळ माजवणाऱ्या संजय राऊत यांच्यामुळे मागील काही दिवसात राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. राऊत यांनी भाजपवर (BJP) अनेक आरोप करण्यात येत आहेत. पुढील काळात लवकरच सोमय्या (Kirit Somaiya) पिता पुत्र जेलमध्ये जाणार असे ते म्हणाले होते. (Shiv Sena Sanjay Raut new tweet)

हे देखील पहा-

तसेच शिवसेना (Shiv Sena) भवनध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी आपण लवकरच भाजपच्या काही नेत्यांविरोधामध्ये धक्कादायक खुलासे करणार असल्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे. यातच संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज एक नवे ट्विट केले आहे. राज्यामध्ये आता महाविकास आघाडी आणि भाजप नेत्यांमध्ये तुफान चिखलफेक सुरू झाली आहे.

शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेपासून सुरू झालेल्या आरोप (Allegations)- प्रत्यारोपांच्या आतषबाजीचा आज दुसरा अंक बघायला मिळाला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांनी ‘त्या’ १९ बंगल्यांचा मालमत्ता कर भरल्याच्या पावत्या (Receipt) जाहीर केले आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी राऊत ‘राष्ट्रवादी’ (NCP)च्या इशाऱ्यावरून शिवसेना संपवायला निघाले असल्याचा आरोप केला आहे.

Sanjay Raut
Beed: जिल्ह्यात ऊस गाळप प्रश्न ऐरणीवर; शेतकरी आर्थिक अडचणीत

शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी ‘ईडी’च्या कारवाईला घाबरून राणे भाजपमध्ये गेल्याचे सांगितले आहे. यातच संजय राऊत यांनी आज परत एकदा नवीन ट्विट केले आहे. या ट्विटच्या माध्यमातून त्यांनी परत एकदा विरोधकरांना डिवचण्याचा प्रयत्न यावेळी केला आहे. "मेरा यही अंदाज ज़माने को खलता है, कि चिराग हवा के खिलाफ क्यों जलता है..." असे ट्विट करत राऊत यांनी आपला एक खास फोटो शेअर केला आहे. राऊतांनी याअगोदर अनेकदा अशा पद्धतीने ट्विट केले आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com