Shiv Sena Leader Vasant More
Moment when a speeding vehicle rushed towards Vasant More during his Facebook Live on Navale Bridge.saamtv

मोठी बातमी! वसंत मोरे अपघातातून थोडक्यात बचावले, नवले पुलावरील दुर्घटनांबाबत सुरू होतं फेसबुक लाईव्ह| Video Viral

Shiv Sena Leader Vasant More: पुण्यातील नवले पुलावर फेसबुक लाईव्ह करताना शिवसेना नेते वसंत मोरे एका मोठ्या अपघातातून थोडक्यात बचावलेत. एक भरधाव वेगात येणारी गाडी थेट त्यांच्या दिशेने आली.
Published on
Summary
  • पुण्यातील नवले पुलावर होणाऱ्या अपघात संदर्भात सुरू होतं फेसबुक लाईव्ह

  • अपघात रोखण्याबाबत उपाययोजना काय करता येतील त्याबाबत देत होते माहिती.

  • नवले पूल परिसरात दोन रिक्षांची धडक होत अपघात

शिवसेनेचे नेते वसंत मोरे अपघातातून थोडक्यात बचावले आहेत. फेसबूक लाइव्ह करताना एक वाहन थेट वसंत मोरेंच्या दिशेने भरधाव वेगाने आले. प्रसंगावधान वसंत मोरे अपघातातून थोडक्यात बचावले.

पुण्यातील नवले पुलावर सतत होणाऱ्या दुर्घटनांबाबत शिवसेना नेते वसंत मोरे फेसबूक लाईव्ह करत होते. नवले पुलावरील अपघात रोखण्याबाबत उपाययोजना काय करता येतील या विषयावर ते फेसबुक लाईव्ह करत होते. त्याच दरम्यान एक वाहन त्यांच्या विरुद्ध दिशेने येत होते. ते वाहन थेट वसंत मोरे उभे असलेल्या दिशेने भरधाव वेगाने आलं. पण वेळची मोरे यांचा कॅमेरामन आणि स्वत: वसंत मोरे रस्त्याच्या बाजुला धावल्यानं ते बचावले.

पुण्यातील नवले पूल परिसरात अपघात

पुण्यातील नवले पूल परिसरात दोन रिक्षांची धडक होत अपघात झालाय. यादरम्यान प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. यात दोन्ही रिक्षांचे मोठे नुकसान झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com