
संजय गडदे, साम टीव्ही
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विषयी ठाकरे गटाचे माजी खासदार विनायक राऊत यांनी केलेल्या अपमानास्पद टीकेमुळे शिवसेना शिंदे गट आक्रमक झाला आहे. विनायक राऊतांच्या टीकेनंतर शिंदे गटाकडून त्यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनाची भूमिका घेतली. मात्र, पोलिसांनी शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना आधीच रोखलं. आगामी निवडणुकीआधी शिवसेनेचे दोन्ही गट एकमेकांविरोधात आक्रमक झाले आहेत. या आंदोलनामुळे परिसरात तणावाचं वातावरण पाहायला मिळालं.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीमुळे राज्यातील वातावरण तापलंय. विविध शहरातील महापालिका निवडणुका शिवसेनेच्या दोन्ही गटासाठी प्रतिष्ठेसाठी असणार आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या दोन्ही गटाने जोरदार तयार केली आहे. शिवसेनेच्या दोन्ही गटाने वर्धापनाच्या दिवशी शक्तिप्रदर्शन केलं. याचदरम्यान राऊतांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. या टीकेवरून शिंदे गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे. शिंदे गटाने थेट विनायक राऊत यांच्या वाकोल्यातील निवासस्थानाबाहेर आंदोलन करण्याची भूमिका घेतली.
शिंदे गटाकडून विनाय राऊत यांच्या विरोधात त्यांच्या निवासस्थानी आंदोलन करण्याचा निर्धार केला होता. या आंदोलनाची कुणकुण वाकोल्यातील शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना लागली. त्यानंतर ठाकरे गटाचे शेकडो कार्यकर्ते विनायक राऊत यांच्या निवासस्थानाबाहेर जमा झाले. दोन्ही गट आमने-सामने येण्याची शक्यता निर्माण झाली. त्यामुळे वाकोला पोलिसांनी शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना वाकोला पोलीस ठाण्याजवळ रोखलं. यावेळी शिंदे गटाकडून विनायक राऊत यांचा निषेध करण्यासाठी तृतीयपंथीयांना देखील बोलवण्यात आलं. शिवसेनेच्या दोन्ही गटांकडून एकमेकांवर टीका देखील करण्यात आली.
राऊतांच्या टीकेचा निषेध करण्यासाठी शिंदे गटाकडून वाकोला येथे जोडे मारो आंदोलन पुकारण्यात आलं. विभाग क्रमांक सातच्या माध्यमातून हे जोडे मारो आंदोलन करण्यात आलं. दुसरीकडे ठाकरे गट देखील रस्त्यावर उतरला. त्यांनीही शिंदे गटाच्या विरोधात घोषणाबाजी केली. दोन्ही गटाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.