Maharashtra Political News:...पण अंगभर कपडे घालून नाचणारी गौतमी चालत नाही; शिंदे गटाचा विरोधकांवर पलटवार

shinde group leader minakshi shinde on sushma andhare : विरोधकांच्या टीकेला शिंदे गटाने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
Maharashtra Politics
Maharashtra PoliticsSaam tv
Published On

विनय म्हात्रे

Maharashtra Politics:

ठाण्यात गेल्या रविवारी दिवाळी पहाटनिमित्त लोकप्रिय न्यृतांगणा गौतमी पाटीलच्या नृत्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. दिवाळी पहाटच्या कार्यक्रमात गौतमी पाटीलच्या नृत्याचे आयोजन केल्याने विरोधकांनी शिंदे गटावर टीका केली होती. विरोधकांच्या टीकेला शिंदे गटाने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. (Latest Marathi News)

ठाण्यातील गौतमी पाटीलच्या कार्यक्रमावरून ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी शिंदे गटावर टीका केली होती. विरोधकांच्या या टीकेला शिंदे गटाच्या महिला ठाणे जिल्हाध्यक्ष मिनाक्षी शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Maharashtra Politics
Sushama Andhare News: ठाण्यात वाजवली ती दंगलगाणी आहेत; गौतमी पाटीलच्या कार्यक्रमावरून सुषमा अंधारेंची शिंदे गटावर टीका

'तुम्हाला उर्फी जावेद, राखी सावंत, सनी लिओनी, क्रिकेट सामन्यांमध्ये नाचणाऱ्या चिअर्स गर्ल चालतात, पण अंगभर कपडे घालून नाचणारी गौतमी पाटील चालत नाही, अशा शब्दात मिनाक्षी शिंदे यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिलं आहे.

'दोन बडे नेते बरळले आहेत, मला त्यांच्या बालबुद्धीची कीव येतेय. सुषमा अंधारे आणि जितेंद्र आव्हाड यांनी ज्या पद्धतीने वक्तव्य केलंय. दिवाळी पहाटनिमित्त दिवाळी पहाटची व्याख्या काय आहे? त्यांना कळलं नाही का? कोणी ठरवलं हे मला माहिती नाही. लोककलेचा सन्मान ठाणेकर करत आहेत. कलाकारांचा आदर करणे हे ठाणेकरांची संस्कृती आहे , असे शिंदे म्हणाल्या.

'गौतमी पाटीलने माझ्या स्टेजवर नृत्याचा कार्यक्रम सादर केला. मीनाक्षी शिंदे यांच्या कार्यक्रमातील गर्दी बघून आव्हाड यांच्या पोटात दुखलं असेल, त्यामुळे त्यांनी वक्तव्य केलं. त्यांनी खरंतर कलाकारांचा अपमान केला आहे. आम्ही मुंब्य्रात त्यांना पळून लावलं. तर सुषमा अंधारे यांच्या डोक्यात प्रकाश पडावा, दिवाळी अंधारातून प्रकाशाकडे नेते, अशा शब्दात मिनाक्षी शिंदे यांनी टीका केली आहे.

Maharashtra Politics
Ambarnath Shiv Mandir: प्राचीन अंबरनाथ शिवमंदिर परिसराचा होणार कायापालट, १५० कोटींचा निधी मंजूर

'गौतमी पाटील ही महिला कलाकार आहे. ठाणेकरांनी तिला चांगल्या दृष्टिकोनातून पाहिलं आहे. तिच्यासाठी पहाटेपासून लोक कार्यक्रमासाठी जमले होते, असेही त्यांनी सांगितलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com