राज्यातील शिवभोजन थाळी योजना सुरूच राहणार; शिंदे सरकारचा गोरगरीब जनतेला मोठा दिलासा

महाविकास आघाडी सरकारच्या काळात सुरू करण्यात आलेली शिवभोजन थाळी सुरूच राहणार अशी माहिती समोर आली आहे.
shivbhojan thali Scheme News
shivbhojan thali Scheme Newssaam tv
Published On

रश्मी पुराणिक

Shivbhojan thali Scheme News : महाविकास आघाडी सरकारच्या काळात सुरू झालेली शिवभोजन थाळी (ShivBhojan Thali) बंद होणार अशी चर्चा सुरू झाली होती. मात्र, शिवभोजन थाळी योजनेबाबत नवीन माहिती समोर आली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात सुरू करण्यात आलेली शिवभोजन थाळी योजना सुरूच राहणार अशी माहिती समोर आली आहे.

shivbhojan thali Scheme News
बाळासाहेब ठाकरेंसोबत सावलीसारखी असणारी व्यक्ती शिंदे गटात; म्हणाला, हिंदुत्वाच्या विचारांना पाठींबा...

शिंदे गट आणि भाजप युतीचे सरकार राज्यात विराजमान झाल्यावर महाविकास आघाडी सरकारचे अनेक निर्णय रद्द केले. त्यानंतर शिंदे सरकार शिवभोजन थाळी योजना देखील रद्द करण्यात येणार असल्याची चर्चा होती. मात्र, शिवभोजन थाळी योजना सुरूच राहणार असणार अशी माहिती समोर आली आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना आश्वासन दिलं आहे. आज, सोमवारी शिवभोजन थाळी सुरू ठेवावी की नाही ? याबाबत आढावा घेण्यात आला. याची माहिती मिळाल्यानंतर माजी मंत्री भुजबळ यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांना संपर्क केला, तेव्हा फडणवीस यांनी शिवभोजन थाळी बंद करणार नसल्याचे आश्वासन भुजबळ यांना दिले आहे.

shivbhojan thali Scheme News
मराठा समाजाबाबतच्या वादग्रस्त वक्तव्यावर जयंत पाटलांची सडकून टीका; म्हणाले, मस्ती वाढली...

दरम्यान, सध्या राज्यात १ लाख ८० हजार शिवभोजन थाळ्यांसाठी परवानगी आहे. त्यातील १ लाख ४० हजार थाळ्या दिवसाला खाल्या जातात. मागील मविआ सरकारने या थाळ्यांची संख्या २ लाखापर्यंत नेण्याचा प्रस्ताव मांडला होता. मात्र, ही योजना आता वादाच्या भोवऱ्यात आणि राजकारणाच्या कचाट्यात सापडली होती. त्यामुळे शिवभोजन लाभार्थींच्या या योजनेपासून मुकावे लागणार होते. मात्र, ही शिवभोजन थाळी योजना बंद होणार नाही, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे शिवभोजन लाभार्थींना मोठा दिलासा मिळाला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com