बाळासाहेब ठाकरेंसोबत सावलीसारखी असणारी व्यक्ती शिंदे गटात; म्हणाला, हिंदुत्वाच्या विचारांना पाठींबा...

'स्वर्गीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्वाचे विचार जी व्यक्ती पुढे घेऊन जात आहे. अशाच व्यक्तीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार.'
Balasaheb Thackeray And Champa Singh Thapa
Balasaheb Thackeray And Champa Singh ThapaSaam TV
Published On

भूषण शिंदे -

मुंबई: स्वर्गीय शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांची सावली समजले जाणारे चंपासिंह थापा (Champa Singh Thapa) आणि मातोश्रीवर प्रदीर्घ काळ सेवा बजावलेले मोरेश्वर राजे यांनी आज शिंदे गटात प्रवेश केला.

टेंभी नाक्यावरील अंबे मातेच्या आगमन मिरवणुकी वेळी या दोघांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला जाहीर पाठिंबा देत शिंदे गटात प्रवेश केला आहे. एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) बंडखोरीनंतर शिवसेनेत मोठी फूट पडली आणि सेनेमधून अनेक खासदार, आमदारांसह असंख्य कार्यकर्ते शिंदे गटात सामील झाले आहेत.

अशातच आता बाळासाहेब हयात असताना त्यांच्यासोबत सावलीप्रमाणे वावरणारे बाळासाहेबांचे सहाय्यक चंपासिंह थापा (Champa singh Thapa) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित शिंदे गटात प्रवेश केला आहे. बाळासाहेब ठाकरेंचे सर्वात विश्वासू अशी चंपासिंह थापा अशी ओळख आहे.

पाहा व्हिडीओ -

तर आपण स्वर्गीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्वाचे विचार जी व्यक्ती पुढे घेऊन जात आहे. अशाच व्यक्तीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याचे चंपासिंह थापा आणि मोरेश्वर राजे यांनी सांगितलं. तर या दोघांनी शिंदे गटात प्रवेश केला यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार रवींद्र फाटक, ठाणे जिल्हाप्रमुख शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के, कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, युवासेना विस्तारक राहुल लोंढे आणि शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

Balasaheb Thackeray And Champa Singh Thapa
'पीएफआय'च्या निशाण्यावर RSS-BJP नेते, संघ मुख्यालय; ATSच्या तपासात धक्कादायक माहिती समोर

तर चंपासिंह थापा यांनी शिंदे गटात प्रवेश करताच भाजपनेते अतुल भातखळकर यांनी उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका केली आहे. याबाबत त्यांनी एक ट्विट केलं असून या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, टबाळासाहेबांचे निकटवर्तीय चंपासिंह थापा यांचा शिंदे गटामध्ये प्रवेश, बाळासाहेबांच्या सुपुत्राच्या थापा ऐकून हादरलेला थापा हळूच सटकला असावा.' असं म्हणत भातखळकर यांनी ठाकरेंवर निशाणा साधला.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com