Devendra Fadanavis and Eknath Shinde
Devendra Fadanavis and Eknath Shinde Saam TV

देसाई 'पावनगड' तर राठोड 'शिवनेरीवर', नव्या मंत्र्यांना बंगल्याचे झाले वाटप

राज्यात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत तब्बल ४० दिवसानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार झाला.
Published on

मुंबई: राज्यात शिंदे-फडणवीस (Eknath Shinde) सरकार सत्तेत तब्बल ४० दिवसानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. मंत्र्यांना खात्यांचे वाटपही झाले. आज मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप करण्यात आले आहे. आता शिंदे सरकारमधील नवनियुक्त मंत्र्याना बंगल्यांचेही वाटप करण्यात आले आहे.

Devendra Fadanavis and Eknath Shinde
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांसाठी घेतले 'हे' महत्वाचे १२ निर्णय

गेल्या तीन दिवसापासून विधान सभेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनाचे तिनही दिवस वादळी ठरले आहेत. आज चौथा दिवसही वादळी ठरला. तर दुसरीकडे विरोधकांनी शिंदे गटातील आमदारांविरोधात घोषणाबाजी सुरू केली आहे. तर दुसरीकडे आज नव्या १८ मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप करण्यात आले आहे.

आज विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा (Farmers) मुद्दा उपस्थित केला. या पार्श्वभूमिवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांसाठी १२ महत्वाचे निर्णय जाहीर केले आहेत. नियमित कर्जफेड केलेल्या शेतकऱ्यांना ५०,००० रुपये प्रोत्साहन अनुदान वाटप सप्टेंबर महिन्यात सुरु केले जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केली.

Devendra Fadanavis and Eknath Shinde
मोठा कट उधळला! PM मोदींच्या दौऱ्याच्या एक दिवस आधीच पंजाबमध्ये शस्त्रसाठा जप्त

या मंत्र्यांना मिळाला हा बंगला

१) ॲङ राहूल नार्वेकर अध्यक्ष , महाराष्ट्र विधानसभा - शिवगिरी, २) राधाकृष्ण विखे - पाटील , रॉयलस्टोन ३) सुधीर मुनगंटीवार, पर्णकुटी ४) चंद्रकांतदादा पाटील- लोहगड ५) विजयकुमार गावित- चित्रकूट ६) गिरीश महाजन- सेवासदन ७) गुलाबराव पाटील - जेतवन ८) संजय राठोड- शिवनेरी ९) सुरेश खाडे- ज्ञानेश्वरी ९) संदिपान भुमरे- ब2 रत्नसिंधु १०) उदय सामंत- मुक्तगिरी ११) रविंद्र चव्हाण ,अ ६ रायगड १२) अब्दुल सत्तार- पन्हाळगड १३) दिपक केसरकर- रामटेक १४) अतुल सावे- शिवगड १५) शंभूराज देसाई - पावनगड १६) मंगलप्रभात लोढा - सिंहगड

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com