Breaking : शरद पवारांची प्रकृती पुन्हा बिघडली; पुन्हा रूग्णालयात दाखल करणार

Sharad Pawar Health Update : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना अशक्तपणा जाणवल्याने पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात येणार आहे. डॉक्टरांनी खबरदारीचा उपाय म्हणून विश्रांतीचा सल्ला दिला असून सध्या प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.
Sharad Pawar news
Sharad Pawar Saam tv
Published On

सागर आव्हाड, पुणे प्रतिनिधी

Sharad Pawar health update today : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांची प्रकृती पुन्हा एकदा खालावली आहे. त्यामुळे त्यांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात येणार आहे. ८५ वर्षीय पवारांना गेल्या काही दिवसांपासून प्रचंड अशक्तपणा (Weakness) जाणवत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून डॉक्टरांनी त्यांना रुग्णालयात भरती होण्याचा सल्ला दिला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शरीरातील थकवा दूर करण्यासाठी त्यांना सलाईन (IV Fluids) लावण्यात येणार आहे. मागील आठवड्यातही शरद पवार यांची प्रकृती बिघडली होती, त्यामुळे याच रुग्णालयात उपचार घेत होते. डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांनी पुन्हा कामाला सुरुवात केली होती. मात्र त्यांना पुन्हा थकवा जाणवू लागला आहे. डॉक्टरांनी त्यांना पूर्ण विश्रांती घेण्यास सांगितले आहे. सध्या तरी चिंतेचे कोणतेही मोठे कारण नसल्याचे सूत्रांकडून समजते.

Sharad Pawar news
Beed Crime : मुंडेंच्या मुलाला कराड समर्थकाची मारहाण, ट्युशनवरून येताना अडवले अन्...

शरद पवार पुढील दोन दिवस रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचार घेणार असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. शरद पवारांना उलट्यांचा त्रास झाल्यामुळे डिहायड्रेशन झाले आहे. शरद पवारांची रक्ताची चाचणी करण्यात आली. सिटीस्कॅन देखील करण्यात आलेलं आहे. रिपोर्ट नॉर्मल असल्याचे माहिती रूबी हॉल क्लिनिकमधील डॉक्टरांनी दिली. शरद पवार यांच्यासोबत सुप्रिया सुळे देखील रुबी हॉल रुग्णालयात उपस्थित आहेत.

Sharad Pawar news
३ मुलांना विष पाजले, बायकोचा गळा चिरला आणि स्वत:ला गळफास लावला, कुटुंबाची सामूहिक आत्महत्या; टोकाचे पाऊल का उचलले?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com