सचिन जाधव
Sharad Pawar News : 'लेखक फ. मु. शिंदे यांच्या मनात अस्वस्थता वाटते. समाजातील मोठा वर्ग वंचित राहत असेल. त्यामुळे त्याबाबत त्यांच्या मनात अस्वस्थता पाहायला मिळते. ते त्यांच्या लिखाणातून कळतं. त्यांच्या मनात शेती, शेतकरी यांचा विषय असेल, त्यामुळे ते लिहितात. पण आता समाजातील चित्र अस्वस्थ आहे. विचार बदलून क्रांती होत नसेल तर काय उपयोग ? असं त्यांना लिहून वाटत असेल, असं स्पष्ट मत शरद पवार (Sharad Pawar) यांनी व्यक्त केले.
पुण्यात लेखक फ.मु. शिंदे यांच्या लिखित पुस्तकाचा प्रकाशन सोहळ्याचा कार्यक्रम पार पडला. पुण्यात समग्र कविता खंड २ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आणि फ. मु. शिंदे यांचा अमृमहोत्सवाचा कार्यक्रम पार पडला. पुण्यातील पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवनात पार पडला. या सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे यांची विशेष उपस्थिती होती. या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपस्थितांशी संवाद साधला.
शरद पवार म्हणाले, 'महत्वाचा कार्यक्रम आहे. ज्यांना साहित्य आणि लिखाण याची जास्त पार्श्वभूमी नाही असे फ.मु. शिंदे यांचे उत्तुंग व्यक्तिमत्व आहे. माझा परिचय बराच वर्षांचा आहे. अनेक वर्षांपूर्वी माझी काम संपल्यावर काही लोकांना एकत्रित घेऊन गप्पा हे काम होतं. त्यावेळी उत्तम काव्य ऐकायला मिळतं. औरंगाबाद आणि नागपूरमध्ये उत्तम साहित्यिक होते. फ. मु. यांनी कधी साधेपणा सोडला नाही'.
'फिरकी घेणं, माणसं जोडणे हे त्यांचं काम अखंडपणे काम सुरू आहे. ते ७५ वर्षांचे आहे असं वाटत नाही. ते ४५ वर्षांचे आहे असं वाटतं. साहित्यिक माणूस यांचं खूप वेगळं नातं असतं. खेडोपाडी राहणाऱ्या लोकांना खूप माहिती असते, असेही ते म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.