Rohit Pawar: 'गबरू जवान' म्हणत मोहित कंबोज यांनी रोहित पवारांचं नाव न घेता केले गंभीर आरोप

'ग्रीन एकर कंपनीचा २०० वेगवेगळे स्टार्ट अप्स करणारा 'गबरू जवान'चा गिनीज बुकमध्ये रेकॅार्ड करा.'
Rohit Pawar/Mohit Kamboj
Rohit Pawar/Mohit KambojSaam Tv
Published On

सुशांत सावंत -

मुंबई: भाजप नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी ट्विटद्वारे पुन्हा एकदा मोठा गौप्यस्फोट केला आहे. या ट्विटमधून त्यांनी नाव न घेता रोहित पवारांवर (Rohit Pawar) अनेक गंभीर आरोप केले आहेत. कंबोज यांनी ट्विटमध्ये लिहलं आहे की, 'ग्रीन एकर कंपनीचा २०० वेगवेगळे स्टार्टअप्स करणारा 'गबरू जवान'चा गिनीज बुकमध्ये रेकॅार्ड करायला हवं.

प्लास्टिक, हिरा गोल्ड, बिल्डर, दारूपासून ते चड्डी विकण्याचा धंदा करणाऱ्या ग्रीन एकर रिसॅार्टचा अभ्यास सुरू आहे. गबरू जवानच्या या बिझनेस मॅाडेलमध्ये २००७ ते २०१२ पर्यंत महाराष्ट्र बॅंकेला १००० कोटींच नुकसान झालं होतं.

या बॅंकेने गबरू जवानला करोडो रूपयांच कर्ज दिलं. ५० कोटी रूपयांना कारखाना कार्टेल बनवत बारामती ॲग्रोने (Baramati Agro) विकत घेतला, याच कारखान्यानं परत १५० कोटी रूपयांच कर्ज घेतलं. HDIL - PMC बॅंक आणि पत्रा चाळ घोटाळ्यात गबरू जवानाने किती साखर खाल्ली आहे हे ही लवकरच कळेल असं ट्विट कंबोज यांनी केलं आहे.

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार हे संचालक राहिलेल्या ग्रीन एकर कंपनीने (Green Acre Company) आर्थिक घोटाळा केल्याची तक्रार ईडीला (सक्तवसुली संचालनालय) प्राप्त झाली असून या संदर्भात ईडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

पाहा व्हिडीओ -

याच पार्श्वभूमीवर आता कंबोज यांनी रोहित पवारांना टार्गट करायला सुरुवात केली आहे. कंबोज यांच्या ट्विटचा रोख हा रोहित पवार यांच्याकडेच असल्याचं दिसून येत असून पुन्हा एकदा पवार कुटुबियांवर कंबोज यांनी हल्ला केला आहे.

काही दिवसांपूर्वी पवार यांच्या बारामती एग्रोसंदर्भात ट्विट करत कंबोज यांनी लवकरच राष्ट्रवादीचा आणखी एक मोठा नेता ईडीच्या चौकशीत येणार असल्याचं विधान केलेलं, शिवाय यासंदर्भात केस स्टडी सुरू असल्याचंही कंबोज म्हणाले होते. त्यानुसार आता पुन्हा एकदा कंबोज यांनी पवार कुटुंबीयांवर निशाणा साधल्याचं दिसत आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com