मराठा समाजासाठी मोलाची कामगिरी विनायक मेटेंनी केली : शरद पवार

शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचे अपघाती निधन झाले आहे.
Vinayak Mete
Vinayak MeteSaam Tv
Published On

मुंबई: शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे (Vinayak Mate) यांचे अपघाती निधन झाले आहे. त्यांच्या गाडीला आज पहाटे मुंबई- पुणे द्रुतगती महामार्गावर माडप बोगद्याजवळ अपघात झाला होता. अपघात झाल्यानंतर त्यांना एमजीएम रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मेटेंच्या निधनानंतर राजकीय वर्तुळातून शोक व्यक्त केला जात आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांनी विनायक मेटेंच्या निधनावर दुःख व्यक्त केले आहे. मराठा समाजासाठी अत्यंत मोलाची कामगिरी करणारा नेता हरपला, अशी प्रतिक्रिया खासदार शरद पवार यांनी दिली.

Vinayak Mete
Vinayak Mete: मराठा समाजाचे तडफदार नेतृत्व महाराष्ट्राने गमावले: दिलीप वळसे पाटील

'आजची सकाळ ही धक्का देणारी सकाळ आहे. विनायक मेटेंची बातमी पाहिली. गेली अनेक वर्षे महाराष्ट्रात मराठा समाजासाठी अत्यंत मोलाची कामगीरी केली. सामाजिक प्रश्नासाठी त्यांच्या काही भूमिका होत्या त्याची त्यांनी मांडणी शास्त्रशुद्ध पद्धतीने केली आहे.'

'प्रश्नांची मांडणी करत असताना त्यांनी कधी कटुता आणू दिली नाही. त्यांनी एकेकाळी राष्ट्रवादी पक्षासोबत काम केले आहे. मुंबईत छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक व्हावे अशी त्यांची इच्छा होती. आज ते आपल्यातून अचानक निघून गेले आहेत. हा एक मोठा धक्का राज्यातील सर्वसामान्यांना बसणारा आहे. जे घडले ते अत्यंत दुख:द आहे. मराठा समाजाची भूमिका मांडत असताना त्यांनी त्यांची भूमिका कधी सोडली नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी दिली.

Vinayak Mete
Kiaan Thackeray: शिवतिर्थावरुन देशभक्तीचं बाळकडू; राज ठाकरेंच्या नातवाचा तिरंग्याकडे पाहताना हृदयस्पर्शी Photo पाहा

आज पहाटे विनायक मेटे आणि त्यांचे सहकारी बीडहून मुंबईकडे जात होते. यावेळी पहाटे पाच वाजता त्यांच्या गाडीला अपघात झाला होता. अपघातानंतर तब्बल एक तास त्यांना मदत मिळाली नसल्याचं त्यांच्या गाडीच्या चालकाने सांगितलं आहे. अखेर त्यांनी मुंबईतील एमजीएम रूग्णालयात अखेरचा श्वास घेतला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com