Kiaan Thackeray: शिवतिर्थावरुन देशभक्तीचं बाळकडू; राज ठाकरेंच्या नातवाचा तिरंग्याकडे पाहताना हृदयस्पर्शी Photo पाहा

Kiaan Amit Thackeray Looking to a Tiranga: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही आपल्या शिवतीर्थ या निवासस्थानी तिरंगा फडकवला आहे.
Kiaan Thackeray Viral Photo
Kiaan Thackeray Viral PhotoSaam TV
Published On

रुपाली बडवे

मुंबई: देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. देशाच्या ७६ व्या स्वातंत्र्यदिनाला अवघे काही तास उरले आहेत. देशभरात घरोघरी तिरंगा फडकवण्यात येत आहे. अशात मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनीही आपल्या शिवतीर्थ या निवासस्थानी तिरंगा फडकवला आहे. आपल्या घराच्या बाल्कनीमध्ये त्यांनी तिरंगा फडकल्यानंतर एक फोटो क्लिक केला आहे. या सुंदर फोटोत अमित ठाकरे (Amit Thackeray) यांचे चिरंजीव म्हणजेच राज ठाकरे यांचा नातू किआन ठाकरे हा राष्ट्रध्वजाकडे पाहताना दिसत आहे. हा हृद्यस्पर्शी फोटो खुद्द राज ठाकरे यांनी आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात टीपला असल्याचं बोललं जातंय. (Kiaan Thackeray Viral Photo)

हे देखील पाहा -

Kiaan Thackeray Viral Photo
Kiaan Thackeray Viral Photoरुपाली बडवे

या फोटोत राज ठाकरे यांच्या घराच्या बाल्कनीत तिरंगा फडकत असल्याचं दिसत आहे. हा तिरंगा फडकत असताना राज ठाकरे यांचा अवघ्या साडेचार महिन्यांचा नातू हा तिरंग्याकडे एकटक बघत आहे. तिरंग्याकडे पाहून गोंडसपणे हातवारे करत आहे. हे भावनिक आणि हृदयस्पर्शी दृष्य राज ठाकरेंनी आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात टीपलं आहे. यावरुन किआनला राष्ट्रभक्तीचे बाळकडू त्यांच्या अगदी लहानपणापासूनच पाजले जात असल्याचं या फोटोवरुन दिसतंय. किआनचा हा फोटो सध्या चांगलाच चर्चेत आहे.

राज ठाकरेंचे (Raj Thackeray) सुपुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) यांना ५ एप्रिल २०२२ ला पुत्ररत्नाची प्राप्ती झाल्यानपासून ठाकरे परिवारात उत्सवाचं वातावरण आहे. मुलगा अमित ठाकरे आणि सूनबाई मिताली अमित ठाकरे यांना पुत्ररत्नाची प्राप्ती झाल्यानंतर ६ मे २०२२ ला बाळाचं बारसं करण्यात आलं. यावेळी बाळाचं नावं किआन (Kiaan) असं ठेवण्यात आलं. किआन हे एक हिंदु नाव आहे. या नावाचा अर्थ 'विष्णुचा अवतार' असा आहे. तसेच प्राचीन आणि देवाची कृपा असलेला असाही या शब्दाचा अर्थ होतो.

Kiaan Thackeray Viral Photo
Breaking: विनायक मेटेंच्या गाडीला मोठा अपघात; अपघातात मेटेंसह सुरक्षारक्षक गंभीर जखमी

दरम्यान पंतप्रधान मोदींनी देशभरातील नागरिकांना स्वातंत्र दिनाचं औचित्य साधत हर घर तिरंगा मोहिमेच्या माध्यमातून प्रत्येकाच्या घरी तिरंगा लावण्याचं आवाहन केलं आहे. देशाला स्वातंत्र मिळून ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्याच पार्श्वभूमावर स्वातंत्र्यदिनाचा अमृत महोत्सव साजरा केला जातोय. या अमृत महोत्सवाचा भाग म्हणूनच हर घर तिरंगा मोहिम राबवली जात आहे. या मोहिमेत राज ठाकरेदेखील सहभागी झाले आहेत. या मोहिमेला राज ठाकरे यांनी पाठिंबा देत शिवतिर्थावर तिरंगा फडकवला आहे. विशेष म्हणजे राज ठाकरे यांनी त्यांच्या घराच्या बाल्कनीत लावलेला तिरंगा आणि त्यांच्या नातवाचा एक अनोखा फोटो कॅमेऱ्यात टिपला आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com