सत्ता आल्यास महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री कोण? शरद पवारांनी थेट सांगूनच टाकलं
Sharad pawarSaam tv

Maharashtra Politics : सत्ता आल्यास महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री कोण? शरद पवारांनी थेट सांगूनच टाकलं, VIDEO

sharad pawar news in marathi : राज्यात सर्व राजकीय पक्षांना आगामी विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. अनेक बड्या नेत्यांनी बैठकांचा सपाटा लावला आहे. याचदरम्यान, शरद पवार यांनी महाविकास आघाडीतील मुख्यमंत्रिपदाबाबत भाष्य केलं.
Published on

नितीन पाटणकर, साम टीव्ही प्रतिनिधी

पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुतीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागलं आहे. मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्यावरून महाविकास आघाडीतही हेवेदावे सुरु झाले आहेत. दुसरीकडे पृथ्वीराज च्व्हाण यांनी ज्या पक्षाच्या सर्वात अधिक जागा असतील, त्यांचा मुख्यमंत्री होईल, असं वक्तव्य केलं. पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्याला दुर्लक्ष करता येणार नसल्याचं भाष्य शरद पवारांनी केलं आहे. शरद पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

शरद पवारांनी पुण्यात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी शरद पवारांनी विविध विषयांवर भाष्य केलं. पृथ्वीराज चव्हाण यांच्या मुख्यमंत्रिपदाबाबतच्या विधानाबाबत भाष्य करताना शरद पवार म्हणाले, 'पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्रिपदाबाबत मांडलेली भूमिका दुर्लक्ष करण्याजोगी नाही. ज्या पक्षाच्या सर्वाधिक जागा येतील, त्या पक्षाचा मुख्यमंत्री होतो, असा संकेत आहे, अशी भूमिका चव्हाण त्यांनी मांडली होती.

सत्ता आल्यास महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री कोण? शरद पवारांनी थेट सांगूनच टाकलं
Sharad Pawar Speech: 'अन्याय अन् जुलूम करणारे सरकार खाली खेचा', शेतकरी मेळाव्यातून शरद पवार गरजले; मोदी सरकारवर घणाघात

जरांगे पाटील यांच्यावर शरद पवार काय म्हणाले?

मनोज जरांगे यांच्या उमेदवारीबाबत बोलताना शरद पवार म्हणाले, 'लोकसभेत प्रत्येकाचा आधिकार आहे. मत मागण्याचा. निवडणूक लढवण्याचा आहे. मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाबरोबरच धनगर, मुस्मिम, लिंगायत आरक्षणाची भुमिका मांडली आहे. ही चांगली बाब आहे. राज ठाकरे यांनी माझे नाव दोन-तीन वेळा का घेतले हे मला माहीत नाही. मी या मार्गाने जात नाही. माझा तसा इतिहास नाही,असे शरद पवार पुढे म्हणाले.

सत्ता आल्यास महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री कोण? शरद पवारांनी थेट सांगूनच टाकलं
Political News : उद्धव ठाकरेच मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी; देवेंद्र फडणवीसांना व्हिलन केलं जातंय; बावनकुळे कडाडले

मुख्यमंत्रिपदावरून मतभेद नाहीत - शरद पवार

'महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रिपदावरून अजिबात मतभेद नाहीत. कुणी कोणत्या रंगाचा पेहराव केला तर महिलांची मते मिळतील का? कुणी कोणत्या रंगाचा पेहराव केला तर त्यामुळे महिलांची मते मिळतील का? आपल्या पक्षाचा नेता मुख्यमंत्री व्हावं असं कुणाला वाटत असेल तर त्यात गैर काही नाही. येत्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रात आणखी जास्त सभा घ्याव्यात म्हणजे आम्ही राज्याला स्थिर सरकार देऊ शकू, असेही शरद पवार म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com