Shahapur News : शहापूर पंचायत समिती भूखंड विक्री प्रकरणी 17 जणांवर गुन्हा दाखल

कल्याण पुर्वचे आमदार गणपत गायकवाड यांनी प्रकरणात घातले लक्ष.
shahapur panchayat samiti
shahapur panchayat samitisaam tv
Published On

- फय्याज शेख

Shahapur News :

शहापूर पंचायत समिती (shahapur panchayat samiti) भूखंड विक्री प्रकरणी १३ तथाकथित वारस व 4 खरेदीदार अशा १७ जणांवर शहापूर पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणे जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता विजय कुमार विसावले यांनी पंचायत समिती बांधकाम उपविभाग यांच्या वतीने फिर्याद दाखल केली होती. त्यानुसार शहापूर पोलीसांनी (shahapur police) गुन्हा दाखल केला आहे. (Maharashtra News)

शहापूर पंचायत समिती नजीत भिंतींचे पक्के कंपाउंड असून सन 1958 साली तात्कालीन उपजिल्हाधिकारी, भिवंडी प्रांत यांनी सर्व्हे नं 108 अ 2 मधील 43 गुंठे जागा अधिग्रहित करून तात्कालीन पंचायत समिती प्रशासनाला दिली होती.

त्यानंतर सर्वे नं 108 अ 3 मधील 27 गुंठे जागा व 27 गुंठे पोटखराबा अशी एकूण 54 गुंठे जागा पंचायत समितीला मिळाल्याने 1959 साला पासून पंचायत समितीच्या विविध विभागाच्या इमारती येथे असुन या जागेवर पंचायत समितीचा पुर्ण ताबा आहे. अशाप्रकारे येथील 97 गुंठे जागे मधील 43 गुंठे जागेचा सातबारा देखील बनविण्यात आला होता.

shahapur panchayat samiti
Karad Bus Fire News : मुंबईला निघालेल्या बसने पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर अचानक घेतला पेट, प्रवासी सुखरुप

मात्र सीटिएस नंबर आणि मिळकत प्रमाणपत्रावर नाव नोंदविण्यासाठी प्रशासनाकडून झालेल्या दिरंगाईचा फायदा तथाकथित वारस आणि खरेदीदार काही संगणमताने चक्क शहापूर शिवतीर्थासह पंचायत समितीच्या 56 गुंठे जागा 16 फेब्रुवारी 2021 रोजी कायम खरेदी खताने कवडीमोल किमतीत विक्री केली होती.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

संपूर्ण तालूक्यामधुन संतापाची लाट

कल्याण पुर्वचे आमदार गणपत गायकवाड (mla ganpat gaikwad) यांनी आगामी हिवाळी अधिवेशनामध्ये या बाबतीत तारांकित प्रश्न पटलावर घेतल्याने प्रशासनाकडून् धडक कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी 13 तथाकत वारस 4 खरेदीदार यांच्या विरोधात शहापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Edited By : Siddharth Latkar

shahapur panchayat samiti
Khandala Ghat : अंडा पॉईंटवर स्वारगेट अलिबाग बसला अपघात, प्रवासी सुखरुप

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com