धक्कादायक: अल्पवयीन मुलीला दारु पाजत लैंगिक अत्याचार; होळीच्या दिवशी घडली घटना

Mumbai Crime News: आरोपी आणि १६ वर्षीय मुलगी हे दोघे व्होल्टेज बार खार येथे भेटले होते. याठिकाणी साहिल नावाच्या आरोपीने पिडीत मुलीला दारू पाजली.
Sexual abuse of a minor girl in andheri while intoxicated
Sexual abuse of a minor girl in andheri while intoxicatedSaam Tv

मुंबई: मुंबईत अल्पवयीन मुलीला दारु पाजत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अंधेरीच्या मरोळनाका परिसरात अल्पवयीन मुलीला दारू (Alcohol) पाजून तिच्यावर अत्याचार (Sexual Abuse) करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. होळीच्या दिवशी (१७ मार्चला) ही घटना घडली होती. (Sexual abuse of a minor girl while intoxicated; The incident took place on the day of Holi)

हे देखील पहा -

Sexual abuse of a minor girl in andheri while intoxicated
Mumbai Local: लोकलची गर्दी वाढली; दररोज तब्बल ६० लाख प्रवाशी करतायत लोकलवारी...

मिळालेल्या माहितीनुसार आरोपी आणि १६ वर्षीय मुलगी हे दोघे व्होल्टेज बार खार येथे भेटले होते. याठिकाणी साहिल नावाच्या आरोपीने पिडीत मुलीला दारू पाजली. त्यानंतर ती नशेत तिला टॅक्सीने अंधेरीच्या (Andheri) मरोळ येथील हाॅटेल लकी गॅलक्सी (Aboos Lucky Galaxy, Andheri) येथे आणले. पिडीत मुलगी नशेत असल्याचा गैरफायदा घेत आरोपीने मुलीवर अत्याचार केले. बदनामीच्या भितीने पिडीत मुलगीने नैराश्येत असताना घडलेला प्रकार तिने कुटुंबियांना सांगितला. त्यानंतर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला असून आरोपीचा शोध सुरू आहे. तसेच पुढील तपासासाठी हा गुन्हा वडाळा पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com