Police Transfer Racket: पोलीसांच्या बदल्यांसाठी देशमुख - परब यांच्यात व्हायच्या गुप्त बैठका

Police Transfer Racket In Maharashtra: पोलीस आस्थापन मंडळ हे केवळ नावापुरतं असून पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा निर्णय हा आधीच घेतला जायचा असा आरोप ओएसडी रवी व्हटकर यांनी केला आहे, ईडीच्या आरोपपत्रात याची माहिती दिलेली आहे.
Police Transfer Racket: OSD Ravi Vhatkar Statement to ED
Police Transfer Racket: OSD Ravi Vhatkar Statement to EDSaam Tv
Published On

मुंबई: पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्याच्या रॅकेट (Police Transfer Racket) प्रकरणी सक्तवसुली संचालनालय अर्थात् ईडीकडून (ED) राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांची झाली होती, तेव्हा देशमुखांनी पोलीस बदल्यांच्या रॅकेट प्रकरणात काही आरोप थेट मुख्यमंत्र्यांच्या जवळ असणारे विद्यमान परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्यावर आरोप केले. यानंतर ओएसडी रवी व्हटकरांनी (OSD Ravi Vhatkar) जबाब नोंदवताना परब यांच्यावरच हल्ला केलाय. पोलीसांच्या बदल्यांसाठी शिवसेना नेते अनिल परब हे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुखांना भेटायचे असा खुलासा ओएसडी रवी व्हटकर यांनी केला आहे. (Secret meetings was happened between Deshmukh and Parab for police transfers)

हे देखील पहा -

पोलीस आस्थापन मंडळ हे केवळ नावापुरतं असून पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा निर्णय हा आधीच घेतला जायचा असा आरोप ओएसडी रवी व्हटकर यांनी केला आहे, ईडीच्या (ED) आरोपपत्रात याची माहिती दिलेली आहे. महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि नियुक्तीपूर्वी अनिल देशमुख आणि शिवसेना नेते अनिल परब यांच्यात गुप्त बैठक व्हायची. या बैठकीत काॅग्रेस नेते, राष्ट्रवादीचे नेते आणि शिवसेनेकडून अनिल परब नाव पाठवायचे. ही यादी मी (रवी व्हटकर) ज्ञानेश्वरी व सह्याद्री अतिथीगृह किंवा मंत्रालयात दिल्याचे व्हटकर यांनी जबाबात म्हटलं आहे. ही बैठक अत्यंत गुप्त आणि खाजगी होती, त्यामुळेच या बैठकींचे कोणतेही रेकॉर्ड किंवा इतिवृत्त तयार करण्यात आले नव्हते असंही ते म्हणाले.

Police Transfer Racket: OSD Ravi Vhatkar Statement to ED
Bandatatya Karadkar: 'मुखाने बाेलतात रामकृष्ण हरी त्यांनीच केली बदनाम नारी'; एनसीपीच्या महिला आक्रमक

मुंबई पोलीस दलात बदल्यांसाठी असलेल्या समितीच्या अध्यक्षस्थानी पोलीस आयुक्त असतात. या समितीमध्ये पीएसआय (PSI) ते डीसीपी (DCP) दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदलीचा निर्णय घेतला जातो. मुंबई पोलिसांतर्गत बदल्यांची यादीही गृहमंत्रालयात तयार करण्यात आली. ही यादी स्वत: गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अनेकवेळा दिली होती. त्यांचे स्वीय सचिव संजीव पलांडे (Sanjeev Palande) किंवा त्यांचे ओएसडी रवी व्हटकर (OSD Ravi Whitkar) यांनीही अनेकदा दिली होती. बदल्यांची यादी शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडून दिली जात होती, अशी माहिती ओएसडी रवी यांनी ईडीच्या आरोपपत्रात दिली आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com