Bandatatya Karadkar: 'मुखाने बाेलतात रामकृष्ण हरी त्यांनीच केली बदनाम नारी'; एनसीपीच्या महिला आक्रमक

सातारा शहरात गुरुवारी बंडातात्या कराडकर यांनी आंदाेलनाप्रसंगी महिला नेत्यांविषयी गंभीर टीका केली हाेती.
ncp protest against bandatatya karadkar statement in satara
ncp protest against bandatatya karadkar statement in satarasaam tv
Published On

सातारा : ह.भ.प बंडातात्या कराडकर यांच्या राज्यातील महिला नेत्यांविषयी केलेल्या वक्तव्याचा सातारा जिल्हा राष्ट्रवादीने (ncp) आज (शुक्रवार) येथे निषेध नाेंदवला. पाेवई नाका येथे राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्या जमल्या. यावेळी गुरुवारी झालेल्या आंदाेलनात बंडातात्यांनी (bandatatya karadkar) महिला नेत्यांविषयी चुकीचे वक्तव्य केले आहे त्यांनी नेत्यांची माफी मागितली पाहिजे अशी मागणी केली. (satara district ncp protest against bandatatya karadkar)

यावेळी महिलांनी हातात बंडातात्यांचा निषेध नाेंदविणारे फलक घेतले हाेते. मुखाने बाेलतात रामकृष्ण हरी त्यांनी केली बदनाम नारी अशी घाेषणा देत (satara) राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या महिलांनी बंडातात्या कराडकरांचा निषेध व्यक्त केला.

ncp protest against bandatatya karadkar statement in satara
Bandatatya Karadkar : बंडातात्यांना RSS आणि भाजपचं पाठबळ नाही - अमृता फडणवीस

दरम्यान आज सकाळी फलटण प्रिंप्रद येथे बंडातात्या कराडकर यांना पाेलिसांनी ताब्यात घेतलं आहे. साम टीव्हीशी बाेलताना बंडातात्यांनी माझी चाैकशी झाली नाही परंतु ते ठाण्यात करतील असे म्हटलं हाेते. राज्य महिला आयाेगाने बंडातात्यांच्या वक्तव्याची चाैकशी करावी अशी मागणी सातारा पाेलिसांना केली आहे.

Edited By : Siddharth Latkar

ncp protest against bandatatya karadkar statement in satara
Bandatatya Karadkar: 'आलीया भाेगासी असावे सादर'
ncp protest against bandatatya karadkar statement in satara
Rupali Chakankar On Bandatatya Karadkar: ते विधान संतापजनक, अशा प्रकारची प्रथा पडू शकते, कारवाई केलीच पाहिजे - रुपाली चाकणकर

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com