Mukesh Ambani Visits Siddhivinayak Temple: मुकेश अंबानी नातू-सुनेसह सिद्धिविनायक मंदिरात पोहोचले, पाहा व्हिडीओ

Ambani Family at Siddhivinayak Temple: मुकेश अंबानी नातू-सुनेसह सिद्धिविनायक मंदिरात पोहोचले, पाहा व्हिडीओ
Ambani Family
Ambani FamilySaam Tv

Ambani Family: रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी बुधवारी मुलगा अनंत,नातू पृथ्वी आणि सून श्लोका मेहतासोबत मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी पोहोचले. यावेळी चौघांनीही बाप्पाचे दर्शन घेत आशीर्वाद घेतले. बाप्पाच्या दर्शनासाठी सिद्धिविनायक मंदिरात पोहोचलेले मुकेश अंबानी आपला नातू पृथ्वीला आपल्या कडेवर घेऊन जाताना दिसले.

बुधवारी लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्सच्या आयपीएल एलिमिनेटर सामन्याच्या काही तास आधी त्यांनी मंदिरात जाऊन दर्शन घेतलं आहे. (Latest Marathi News)

Ambani Family
Dipali Sayyad News : दीपाली सय्यद दाऊदच्या संपर्कात, माजी पीएचा पुनरुच्चार; उद्धव ठाकरेंवरही गंभीर आरोप

अंबानी कुटुंबातील मोठी सून श्लोका दुसऱ्यांदा आई होणार आहे. प्रसूतीपूर्वी ती गणपती बाप्पाचे आशीर्वाद घेताना दिसली आहे. या चौघांनीही गणपती बाप्पाच्या मंदिरात नतमस्तक होऊन लहानग्या पाहुण्यांच्या सुखरूपतेसाठी प्रार्थना केली. (Mukesh Ambani Latest News)

Ambani Family
Maharashtra Politics: मोठी बातमी! माजी आमदार आशिष देशमुख यांची अखेर काँग्रेसमधून हकालपट्टी

दरम्यान, मुकेश अंबानी हे पुन्हा एकदा आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. फोर्ब्सने नुकतीच जगभरातील श्रीमंतांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये ही माहिती समोर आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com