Lalit Patil News: ललित पाटील प्रकरणी महत्वाची अपडेट; ससून रुग्णालयाचे डीन मेहरबान असल्याचा आणखी एक पुरावा सापडला

Sassoon General Hospital Dean: डॉकटर संजीव ठाकूर हे ड्रग माफिया ललित पाटीलवर मेहरबान असल्याचा आणखी एक पुरावा समोर आलाय.
Lalit Patil News
Lalit Patil NewsSaam TV
Published On: 

Lalit Patil Update:

ड्रग माफिया ललित पाटील प्रकरणी पुणे पोलिसांनी आपल्या तपासाचा वेग वाढवला आहे. ललित पाटील प्रकरणात पुण्यातील ससून रुग्णालयाचे डीन यांचा देखील सहभाग असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता. त्यावर आता डॉकटर संजीव ठाकूर हे ड्रग माफिया ललित पाटीलवर मेहरबान असल्याचा आणखी एक पुरावा समोर आलाय.

Lalit Patil News
Pune Crime : लग्नाचे आमिष दाखवून तरुणाची २२ लाखांची फसवणूक; ठगणाऱ्या मुलीविरोधात गुन्हा दाखल

ललित पाटीलचा रुग्णालयातील मुक्काम वाढावा यासाठी डॉकटर संजीव ठाकूर यांनी ललित पाटीलला टी.बी. झाल्याचं पत्र गेल्या महिन्यात ससूनच्या वैद्यकीय अधीक्षकांना लिहिलं होतं. हे पत्र आता समोर आलं आहे. ७ सप्टेंबर २०२३ च्या या पत्रात संजीव ठाकूर यांनी ललित पाटीलला टी.बी.झाला असून त्याला पाठदुखीचा देखील त्रास होत असल्याचं म्हटलंय. त्याचबरोबर ललित पाटीलला ओबेसीटी म्हणजे लठ्ठपणाचा देखील त्रास असल्याचं या पत्रात नमूद करण्यात आलंय.

ललित पाटीलचा ससून रुग्णालयातील मुक्काम वाढावा यासाठी त्याला वेगवेगळे आजार असल्याचं कागदोपत्री दाखवण्यात येत होतं. ससून रुग्णालयात भरती असलेल्या ललित पाटीलची माहिती घेण्यासाठी येरवडा कारागृहाकडून विचारणा झाल्यानंतर डॉक्टर संजीव ठाकूर यांनी ललित पाटीलला टीबी झाल्याचं उत्तर या पत्रात दिलंय.

ललित पाटील प्रकरणातील चारही आरोपींची पोलीस कस्टडी आज संपणार आहे. भूषण पाटील, अभिषेक बलकवडे, प्रज्ञा कांबळे आणि अरविंद लोहारी या चौघांची पोलीस कस्टडी आज संपणार आहे. चारही आरोपींना पुणे पोलीस आज न्यायालयात हजर करणारेत. तर भूषण पाटील आणि अभिषेक बलकवडे यांचा ताबा मुंबई पोलीस मागण्याची शक्यता आहे.

Lalit Patil News
Punjab Crime: माल रोड असोसिएशनच्या अध्यक्षाची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या; VIDEO व्हायरल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com