Sanjay raut
Sanjay raut saam tv

संजय राऊत यांना ईडीचे दुसऱ्यांदा समन्स

संजय राऊत (Sanjay Raut) यांना कथित पत्रा चाळ घोटाळाप्रकरणी ईडीनं समन्स पाठवलं होतं. मात्र, नियोजित कामामुळे राऊत यांना ईडी (ED) कार्यालयात जाता आलं नाही. त्यानंतर ईडीकडून दुसऱ्यांदा समन्स पाठवण्यात आलं आहे.
Published on

सूरज सावंत

मुंबई : एकनाथ शिंदे गटाच्या बंडखोरीनंतर राज्यात सत्तासंघर्ष तीव्र झाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडून बंडखोर आमदारांच्याकडील खाती काढून दुसऱ्यांकडे सोपावण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातीत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. याचदरम्यान संजय राऊत (Sanjay Raut) यांना कथित पत्रा चाळ घोटाळाप्रकरणी ईडीनं समन्स पाठवलं होतं. मात्र, नियोजित कामामुळे राऊत यांना ईडी (ED) कार्यालयात जाता आलं नाही. त्यानंतर ईडीकडून राऊतांना दुसऱ्यांदा समन्स पाठवण्यात आलं आहे. दुसऱ्यांदा पाठवण्यात आलेल्या समन्समध्ये १ जुलै रोजी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ( Sanjay Raut Latest News In Marathi )

Sanjay raut
Maharashtra Political Crisis : डबक्यात बेंडुक असतात, त्यात उतरू नका; राऊतांचा फडणवीसांना सल्ला

एकनाथ शिंदे गटाने बंडखोरी केल्याने शिवसेना अडचणीत सापडली आहे. त्यामुळे शिंदे गटाच्या बंडखोरीमुळे महाविकास आघाडी सरकार धोक्यात आलं आहे. तर बंडखोरीमुळे शिवसेना पक्षात उभी फूट पडली आहे. मात्र, या संकटात शिवसेना नेते, खासदार संजय राऊत आक्रमक घेताना दिसत आहे. संजय राऊत यांच्याकडून बंडखोर आमदारांवर जोरदार टीकास्त्र सोडलं जात आहे. याचदरम्यान, संजय राऊत यांना पत्रा चाळ घोटाळाप्रकरणी ईडीने समन्स पाठवलं होतं. मात्र,त्यावेळी त्यांना नियोजित कामामुळे ईडी कार्यालयात जाता आलं नाही. त्यानंतर ईडीने संजय राऊत यांना दुसऱ्यांदा समन्स पाठविले आहे. दुसऱ्यांदा पाठवण्यात आलेल्या समन्समध्ये १ जुलै रोजी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर दुसरीकडे राज्याचे परिवहनमंत्री व शिवसेनेचे नेते अनिल परब यांची सुद्धा सध्या दापोली रिसोर्टप्रकरणी ईडीकडून चौकशी केली जात आहे.

Sanjay raut
एकनाथ शिंदेंना तेव्हाच उद्धव ठाकरे पक्षातून काढणार होते? खळबळजनक माहिती समोर

काय आहे पत्राचाळ घोटाळा?

रिपोर्टनुसार पत्रा चाळ मुंबईतील गोरेगाव येथे आहे. चाळीत राहणाऱ्या 672 भाडेकरूंना सदनिका देण्याची योजना सरकारने आखली तेव्हा हा घोटाळा सुरू झाला. यासाठी महाराष्ट्र गृहनिर्माण व विकास प्राधिकरणाने एचडीआयएलच्या गुरु आशिष कन्स्ट्रक्शन या कंपनीला कंत्राट दिले होते. गुरु आशिष कंपनी चाळीतील भाडेकरूंना 672 सदनिका देऊन तीन हजार फ्लॅट एमएचडीएला देणार होती.

गुरू आशिष कंस्ट्रक्शन कंपनीचा संचालक राकेश वाधवान आहे. वाधवान यांच्यासोबत संजय राऊतांचे निकटवर्तीय प्रवीण राऊतांचा संबंध आहे. प्रवीण राऊत यांनी राकेश वाधवानसोबत मिळून पत्राचाळीच्या पुनर्विकास प्रकल्पात घोटाळा केल्याचा संशय आहे. या प्रकरणी प्रवीण राऊत यांना अटक आणि सुटका झाली. त्यानंतर पुन्हा 2 फेब्रुवारी 2022 रोजी प्रवीण राऊत यांना पुन्हा अटक झाली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com