मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेलं बंड महाराष्ट्रातसह देशभरात चर्चेचा विषय बनला आहे. शिंदे यांच्या बंडाला भाजपचा (BJP) पाठिंबा असल्याचं बोललं जात आहे. अशातच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पुन्हा एकदा सल्ला दिला आहे. डबक्यांत बेंडुक असतात, फडणवीसांनी त्यात उतरू नये असं संजय राऊत (Sanjay Raut) यांनी म्हटलं आहे. गुवाहाटीच्या डोंगरात आमदार बसले आहेत. नदी, डोंगर, पाणी... त्यांना ११ जुलैपर्यंत आराम करण्याचे निर्देश आहेत. महाराष्ट्रात त्यांचं काही काम नाही. पण ११ तारखेनंतर आमच्या मागणीवर विचार होईल. असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. (Sanjay Raut Latest Marathi News)
काय म्हणाले राऊत?
"देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते आहेत. त्यांच्याकडे ११६ आमदारांचं बळ आहे. इतका मोठा विरोधी पक्ष महाराष्ट्रात कधी निर्माण झाला नव्हता. हा विरोधी पक्ष विधायक काम करू शकतो ही आमची भूमिका आहे. फडणवीसांनी मुख्यमंत्रीपद सांभाळलं आहे. पण त्यांनी सध्या जे इथे डबकं झालं आहे, त्यात उतरू नये. असं संजय राऊत म्हणालेत.
"देवेंद्र फडणवीस यांचीअप्रतिष्ठा आहे असं माझं त्यांना मित्र म्हणून सांगणं आहे. काही लोकांनी राजकारणात डबकं तयार केलं आहे. डबक्यात बेडूक राहतात. फडणवीसांनी स्वत: डबक्यात उतरून काही करण्याचा प्रयत्न केला, तर त्यांच्या पक्षाची, मोदींची आणि स्वत: फडणवीसांची कमालीची अप्रतिष्ठा होईल असं माझं मत आहे. मला खात्री आहे की ते त्या डबक्यात किंवा नरकात उडी मारणार नाहीत". असा सल्लाही त्यांनी फडणवीस यांना दिला आहे.(Devendra Fadnavis Vs Sanjay Raut)
दरम्यान, संजय राऊत यांनी पुन्हा एकदा बंडखोर आमदारांबाबत आपली भूमिका जाहीर केली आहे. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे किंवा आम्ही सगळेच त्यातल्या काही लोकांना बंडखोर मानायला तयार नाही. त्यातले अर्ध्यापेक्षा जास्त लोक आहेत ज्यांना आम्ही बंडखोर मानायला तयार नाही. जोपर्यंत ते मुंबईत येत नाहीत तोपर्यंत आम्ही आशावादी आहोत. काल न्यायालयाच्या निकालानंतर त्यांच्यात पुन्हा चलबिचल सुरू झाली आहे. असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
"एकनाथ शिंदे अजूनही आमचे सहकारी आहेत. पक्षाच्या कार्यकारिणीमध्ये आहेत. ते अजूनही मुंबईत येऊ शकतात. त्यांच्याविषयी माझ्या मनात व्यक्तिगत कटुता असण्याचं कारण नाही. त्यांनी कुठेही जावं". असं देखील संजय राऊत म्हणाले. दरम्यान, पुढे बोलताना संजय राऊत यांनी राज्यपाल यांना टोलाही हाणला आहे.
"अडीच वर्षांपासून १२ आमदार राजभवनाच्या झाडीझुडपात टेबलावर पडून आहेत. त्याची माहिती त्यांनी आधी घेतली पाहिजे. ठीक आहे. राज्यपालांचा करोना बरा झाला आहे. ते कामाला लागले असतील, तर त्या १२ आमदारांची फाईल त्यांनी ताबडतोब क्लीअर करावी". असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
Edited BY - Satish Daud
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.