Sanjay Raut News : 'देशाच्या संसदेचे मालक होण्याचा प्रयत्न कोणी करू नये'; संजय राऊत 'रोखठोक' बोलले

Sanjay Raut Rokhthok: देशाच्या संसदेचे मालक होण्याचा प्रयत्न कोणी करू नये, असे खडेबोल संजय राऊतांनी सुनावले.
Sanjay Raut
Sanjay Rautsaam tv
Published On

Sanjay raut News: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज (28 मे) दिल्लीतील नवीन संसद भवनाचे उद्घाटन सोहळा पार पडत आहे. या नवीन संसद भवनावरून राजकारण पेटलं आहे. नवीन संसद भवनावरून संजय राऊत यांनी दैनिक सामनाच्या 'रोखठोक' सदरातून टीकास्त्र सोडलं आहे. 'देशाच्या संसदेचे मालक होण्याचा प्रयत्न कोणी करू नये, असे खडेबोल संजय राऊतांनी सुनावले. (Latest Marathi News)

संजय राऊत मोदी सरकारवर 'रोखठोक' सदरातून टीका करताना म्हणाले की, ' विरोधकांच्या बहिष्काराची पर्वा न करता पंतप्रधान मोदी हे संसदेच्या उद्घाटन सोहळ्यात भाषण करतील व त्यांनीच जमा केलेला श्रोतृवृंद तेथे टाळ्या वाजवेल. लोकशाहीसाठी हा सर्वात मोठा धोका आहे'.

Sanjay Raut
New Parliament Building: नवीन संसद भवनाचे आज पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन; जाणून घ्या संपूर्ण कार्यक्रमाचे वेळापत्रक

'संसदेच्या उद्घाटनास देशाच्या राष्ट्रपतींना निमंत्रण नाही, विरोधी पक्षनेत्यांना मान नाही. सर्व काही ‘मी’ म्हणजे मोदी. हा अहंकारच आहे. 'राष्ट्रपतींच्या हस्ते संसदेचे उद्घाटन न करणे आणि त्या सोहळ्याला त्यांना न बोलावणे हा देशाच्या सर्वोच्च संवैधानिक पदाचा अपमान आहे,अशीही टीका राऊत यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर केली.

'कोर्टातल्या तारखेसाठी सिसोदिया यांना तुरंगाबाहेर आणले. पत्रकारांनी त्यांचा पिच्छा पुरवला तेव्हा सिसोदिया म्हणाले, 'मोदी हे अहंकारी आहेत'. यावर दिल्लीच्या या माजी उपमुख्यमंत्र्यांना पोलिसांनी कॉलर पकडून फरफटत नेले. लोकशाहीची ही अशी फरफट सुरू आहे. त्यामुळे नवे संसद भवन उभारून काय होणार? असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला.

'भारतीय राज्यघटनेचा एक खांब राष्ट्रपती. त्या डोलाऱ्यावर आपली संसद उभी आहे, पण नव्या संसदेच्या उद्घाटन सोहळय़ाच्या निमंत्रण पत्रिकेवर राष्ट्रपती व उपराष्ट्रपतींचे साधे नाव नाही! हाच वादाचा मुद्दा आहे, असेही ते म्हणाले.

Sanjay Raut
New Parliament Building : नागपुरी सागवानापासून ते राजस्थानच्या लाल खडकापर्यंत, देशाच्या विविधतेने नटले आहे नवीन संसद भवन

'या देशाच्या संसदेचे मालक होण्याचा प्रयत्न कोणी करू नये यासाठीचा हा युद्धप्रसंग आहे, असे खडेबोल राऊत यांनी मोदी सरकारला सुनावले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com