Mumbai's Atal Setu: नको ते स्वप्न पाहणं तरुणाला भोवलं; MTHL वरील फोटो व्हायरल होताच रिक्षा चालकावर गुन्हा दाखल

Auto Rickshaw Spotted On Mumbai's Atal Setu: यावेळी महामार्गावर असलेल्या अन्य वाहनचालकांच्या ते लक्षात आलं. त्यांनी या ऑटोचा फोटो आपल्या फोनमध्ये कैद केला. तसेच सोशल मीडियावर पोस्ट केला.
Mumbai's Atal Setu
Mumbai's Atal SetuSaam TV
Published On

Auto Rickshaw Joyride:

मुंबईकरांसाठी फायदेशीर असलेला मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (MTHL) अटल सागरी सेतू सुरू झाल्यापासून यावरील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आलेत. वाहनचालक येथे नियमांचे उल्लंघन करत आहेत. बेकायदेशीरपणे प्रवेश केल्याप्रकरणी आता एका २४ वर्षीय ऑटो-रिक्षा चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Mumbai's Atal Setu
Badlapur Auto Driver News: शाब्बास रे पठ्ठ्या! बदलापूरच्या रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा; 12 तोळे सोनं असेलेली बॅग प्रवाशांना केली परत

याबाबत अधिक माहिती अशी की, विजय नामदास असं या ऑटो चालकाचं नाव आहे. सागरी पुल 'एक्सप्लोर' करायचा म्हणून त्याने थेट आपली ऑटो घेऊन मुंबई ट्रान्स हार्बर लिंकवर एक फेरी मारली. यावेळी महामार्गावर असलेल्या अन्य वाहनचालकांच्या ते लक्षात आलं. त्यांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र तरुण थांबला नाही. एका व्यक्तीने या ऑटो चालकाचा फोटो आपल्या फोनमध्ये कैद केलाय. तसेच सोशल मीडियावर पोस्ट केलाय.

ट्वीटर अकाऊटवर फोटो पोस्ट करत त्यांनी मुंबई ट्राफीक पोलिसांना देखील टॅग केलं होतं. त्यानुसार ऑटो चालक तरुणावर शिवडी पोलीस अधिकाऱ्यांनी कारवाई केली आहे. पोलिसांना फोटोमध्ये रिक्षा आणि त्यावरील क्रमांक दिसत होता. त्यानुसार त्यांनी रिक्षाला ट्रॅक केलं आणि तरुणावर नियम मोडल्याप्रकरणी कारवाई केली.

उलवे आणि चिर्ले टोलनाक्यावरून तरुणाने रिक्षा आणली होती. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यावर असे का केले असे विचारले. त्यावेळी त्याने सांगितले की, मला फक्त सागरी सेतूवरून प्रवासाचा अनुभव घ्यायचा होता. रस्त्यावर कोणतेही वाहन नव्हते त्यामुळे मी मनातली इच्छा पूर्ण करण्यासाठी असं केल्याचं त्याने सांगितलं.

MTHL वर लहान वाहनांना धोका

MTHL सह 100kmph ची वेगमर्यादा असलेल्या पुलांवर लहान वाहनांना बंदी आहे. त्यामुळे येथेही नो एंट्रीचा बोर्ड लावण्यात आला आहे. मात्र तरीही तो तरुणस या पुलावर आला.त्यामुळे त्याच्याविरोधात एफआयआर नोंदवण्यत आलीये. सागरी सेतूवर वाहतूक पोलिसांनी आतापर्यंत २७० वाहनचालकांना दंड ठोठावलाय.

Mumbai's Atal Setu
Pune Crime: पोलिसांची मोठी कारवाई; पुण्यात वेश्याव्यवसाय करणाऱ्या अभिनेत्रीसह २ रशियन मॉडेल ताब्यात, परदेशातील कनेक्शन उघड

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com