Video : चंद्रकांत पाटील यांच्या खदखदीची सचिन सावंतांनी गाण्यातून उडवली खिल्ली

Sachin Sawant Tweet on Chandrakant Patil: मनावर दगड ठेवून आपण एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते.
Chandrakant Patil And Sachin Sawant
Chandrakant Patil And Sachin SawantSaam TV
Published On

मुंबई: मनावर दगड ठेवून आपण एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना मुख्यमंत्री केले, त्यावेळी आपल्या सर्वांना दुःख झाले. ते दु:ख पचवून पुढे गेलो कारण आपल्याला गाडा पुढे हाकायचा होता, असं वक्तव्य भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी आज केले. त्यामुळे आता भाजपमधील खदखद समोर आली आहे. चंद्रकांत पाटील यांच्या या खदखदीची कॉंग्रेस नेते सचिन सावंत यांनी खिल्ली उडवली आहे. सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी मिलन चित्रपटातील 'मैं खुश हूं मेरे आंसुओं पे न जाना' हे गाणं ट्विट करत चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याची खिल्ली उडवली आहे. (Sachin Sawant Latest News)

हे देखील पाहा -

नेमकं काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील?

आज, शनिवारी पनवेलमध्ये भाजपची प्रदेश कार्यकरणीची बैठक होती. या बैठकीत बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले होते की, "केंद्रातील नेत्यांनी आदेश दिला आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाले आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाले. मनावर दगड ठेवून आपण सर्वांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले, आपल्याला दुःख झाले. पण आपण दुःख पचवून पुढे गेलो कारण आपल्याला गाडा पुढे हकायचा होता. सलग पाच वर्षे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री राहिले आहेत." भाजपमध्ये नाराजी असल्याचे बोलले जात होते. आता मात्र कार्यकारणी बैठकीमध्ये चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्याने भाजपमधील खदखद समोर आली आहे.

पवारांनीही घेतली फिरकी

चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्याची फिरकी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनीही घेतली आहे. चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर बोलताना शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले, "मुख्यमंत्रिपद एकनाथ शिंदे यांना दिल्यानंतर दगड डोक्यावर ठेवला काय आणि छातीवर ठेवला काय हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे" अशा शब्दांत शरद पवारांनी भाजपची फिरकी घेतली.

Chandrakant Patil And Sachin Sawant
'आम्ही किती दगड ...'; चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यानंतर शिंदे गटाकडून खोचक प्रतिक्रिया

भाषणाचा व्हिडिओ फेसबुकवरुन डिलीट

चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ नंतर त्यांच्या अकाऊंटवरुन डिलीट (हटवण्यात) करण्यात आला. आपल्या भाषणात पुढे चंद्रकांत पाटील म्हणाले, आपल्याला मुंबई महापालिका जिंकायची आहे. जेव्हापासून शपथ घेतली, तेव्हापासून आपण सर्व मुंबईत आहोत, त्यामुळे आता चला आपल्या घरी कामाला लागू. जेव्हा सर्व ठरेल तेव्हा तुम्हाला बोलावले जाईल आणि तेही वेळेत होईल. आगामी काळात आपण खूप परिश्रम घेऊ. नेत्यांनी आदेश करायचा नसतो इच्छा व्यक्त करायची असते आणि आपण त्याच पालन करायचे असते, असंही पाटील म्हणाले.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com