रशिया-युक्रेनमधील युध्दजन्य परिस्थितीत अडकलेल्या विद्यार्थांसाठी जयंत पाटलांची हाक...

मोदीजी विद्यार्थी हे आपले भवितव्य आहे, त्यांना लवकरात लवकर मायभूमीत परत आणण्यासाठी प्रयत्न करा - जयंत पाटील
jayant patil
jayant patilSaam Tv
Published On

रश्मी पुराणिक

मुंबई - मोदीजी विद्यार्थी हे आपले भवितव्य आहे.त्यांना लवकरात लवकर मायभूमीत परत आणण्यासाठी प्रयत्न करा अशी विनंती करणारे ट्वीट राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना टॅग करून केले आहे.

युक्रेनच्या लष्कराने युध्द सुरू झाले असल्याचे पत्रक काढून नागरीकांना सतर्क केले आहे. तर रशियातील बंडखोर यांनीही युध्दजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने घराबाहेर पडू नका असे सांगितले जात आहे. अशा परिस्थितीत जयंत पाटील यांनी हे ट्विट केले आहे.

jayant patil
Rajasthan: कोटामध्ये वरात घेऊन जाणारी कार नदीत पडली, वरासह आठ जणांचा मृत्यू

रशिया आणि युक्रेन या देशात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या भागात १८ हजारपेक्षा जास्त भारतीय अडकलेले आहेत. त्यात विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे.त्यांना मदत हवी आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदीजी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेवर लक्ष द्या असेही जयंत पाटील यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com