Rajasthan: कोटामध्ये वरात घेऊन जाणारी कार नदीत पडली, वरासह आठ जणांचा मृत्यू

सकाळी माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून बचावकार्य सुरू केले, मात्र कोणालाही वाचवता आले नाही.
Kota News
Kota NewsSaam Tv
Published On

राजस्थान - कोटा (Kota) येथे नवरदेवाची वरात घेऊन जाणारी कार नदीत पडल्याने वरासह आठ जणांचा मृत्यू झाला. काल रात्री बरवाडा येथून वरात उज्जैनकडे (Ujjain) जात असताना नयापुरा कल्व्हर्टवरून चंबळ नदीत पडल्याची घटना घडली. सकाळी माहिती मिळताच पोलिसांनी (Police) घटनास्थळी पोहोचून बचावकार्य सुरू केले, मात्र कोणालाही वाचवता आले नाही.

सकाळी साडेआठच्या सुमारास एक कार नदीत पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर प्रशासन आणि पोलिसांचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. कारमधून सात मृतदेह सापडल्याचे पोलिसांनी सांगितले. बचाव कार्यादरम्यान नंतर एक मृतदेह बाहेर काढण्यात आला.

Kota News
'२०२४ नंतर असे चु*** संपणार', संजय राऊतांची पुन्हा जीभ घसरली

हे सर्व लोक नवरदेवाची वरात घेऊन जात असल्याचे सांगितले जात आहे. मृतांमध्ये वराचाही समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चौथच्या दिवशी ही वरात बरवाडाहून उज्जैनकडे निघाली होती. हा अपघात रात्री उशिरा घडला असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, सकाळी एका व्यक्तीने पाहिल्यानंतर याबाबत माहिती मिळाली.

Edited By -Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com