Pune News: पुण्यात किडनी रॅकेटचा पर्दाफाश, १५ आरोपींमध्ये डॉक्टर तावरेंचाही समावेश; परिसरात खळबळ

Pune Kidney Racket Case: रुबी हॉल किडनी रॅकेट प्रकरणात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ससून सर्वोपचार रुग्णालयाचे तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक डॉ. अजय तावरे यांचा या रॅकेटमध्ये सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Kidney Racket
Kidney RacketSaam
Published On

राज्यात गाजलेल्या रुबी हॉल किडनी रॅकेट प्रकरणात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. या रॅकेटमध्ये ससून सर्वोपचार रुग्णालयातील तात्कालीन वैद्यकीय अधिक्षक डॉ. अजय तावरेचा सहभाग असल्याचे समोर आले आहे. त्याला आता या गुन्ह्यामध्ये सहआरोपी करण्यात येणार आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली आहे. २०२२ साली हा प्रकार घडला होता. याप्रकरणी तब्बल पंधरा जणांवर कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तावरे अखेर पोलिसांच्या जाळ्यात

या प्रकरणात २०२२ साली कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात तब्बल १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र त्यावेळी डॉ. तावरे यांचे नाव एफआयआरमध्ये नव्हते. ते स्वतःचे नाव वगळण्यात यशस्वी ठरले होते. परंतु पुण्यातील पोर्शे अपघात प्रकरणात त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आल्यानंतर, पोलिसांनी जुन्या प्रकरणांची फेरतपासणी करताना डॉ. तावरे यांचा किडनी रॅकेटमधील सहभाग पुन्हा उघड केला.

Kidney Racket
Vaishnavi Hagawane: वैष्णवीच्या नणंदेच्या खास मित्राच्या घरावर पोलिसांची मोठी कारवाई; मध्यरात्री चव्हाणच्या घरी नेमकं काय घडलं?

रॅकेटच्या चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या सेवानिवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील समितीने २०२२ मध्येच डॉ. तावरे याचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. समितीचा अहवाल राज्य सरकारकडे पाठवण्यात आला होता, मात्र एफआयआरमध्ये त्याचे नाव नव्हते. पोलिस आयुक्तालयात हा अहवाल नव्याने वाचण्यात आला, तेव्हा तावरेच्या विरोधातील पुरावे पुन्हा समोर आले.

Kidney Racket
Shocking: हायवेवरच कार थांबवून महिलेशी शरीरसंबंध, व्हिडिओ झाला लीक; आरोपी राजकीय पक्षाशी संबंधित

डॉ. तावरेची मुख्य भूमिका

पोलिस तपासात तावरे हे किडनी रॅकेटमध्ये मुख्य सूत्रधार असल्याचे समोर आले आहे. त्यानेच किडनी देणारे आणि घेणारे यांची खोटी ओळख पडताळली केली असून, सर्व प्रक्रिया मंजूर केल्या. ते रिजनल ऑथरायझेशन कमिटीचे अध्यक्ष होते, ज्याच्या नियंत्रणाखाली ८ सदस्यांची समिती कार्यरत होती. तावरे यांनीच सादर झालेल्या कागदपत्रांची वैधता तपासण्याची जबाबदारी पार पाडली, पण ती कागदपत्रे बनावट असल्याचे आता उघड झाले आहे.

Kidney Racket
Vaishnavi Hagawane: 'दीरानं अवघड जागेवर लाथ मारली अन् मोबाईल घेऊन..' वैष्णवीच्या जावेच्या आईकडून हगवणेंचा विकृत चेहरा समोर

गुन्हे शाखा लवकरच घेणार तावरेचा ताबा

सध्या डॉ. अजय तावरे पोर्शे अपघात प्रकरणात येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. आता गुन्हे शाखा किडनी रॅकेट प्रकरणासाठी तावरेचा ताबा घेण्याच्या प्रक्रियेत आहे. लवकरच या प्रकरणात त्याच्यावर नवीन आरोपपत्र दाखल होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com