'इस्लाम समाज जसा एक होऊन लढला,तसा...'; सरसंघचालक मोहन भागवतांचं मोठं विधान

साम्राज्यात सत्यम शिवम सुंदरम नांदलं पाहिजे ते खरे साम्राज्य, असं मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केलं.
mohan bhagwat
mohan bhagwat saam tv
Published On

ज्ञानेश्वर हिंगोलीकर

पुणे : 'इस्लाम समाज जसा एक होऊन लढला तसा हिंदू समाज एक होऊन लढला नाही. आपला अहंकार वाढला आणि आपण सगळ गमावलं. साम्राज्यात सत्यम शिवम सुंदरम नांदलं पाहिजे ते खरे साम्राज्य', असं मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी व्यक्त केलं. सरसंघचालक मोहन भागवत सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. पुण्यातील एका कार्यक्रमात त्यांनी वक्तव्य केलं. ( Mohan Bhagwat Latest News )

mohan bhagwat
भाजपच्या बैठकीत खलबतं! बंडखोर आमदार म्हणजे २४ कॅरेट शिवसैनिक, सुधीर मुनगंटीवारांचं मोठं विधान

सरसंघचालक मोहन भागवत पुणे दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात डॉ. केदार फाळके लिखित 'शिवछत्रपतींचा वारसा, स्वराज्य ते साम्राज्य' हा ग्रंथ आणि त्याच्या इंग्रजी अनुवादाचे प्रकाशन डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते झाले. त्यावेळी मोहन भागवत बोलत होते. 'ज्या इतिहासातून मार्गदर्शन घेतलं पाहिजे तो इतिहास आपल्या समोर प्रकाशित झालं आहे. हिंदू साम्राज्य दिवस म्हणजे शिवराज्यभिषेक दिवस आहे. व्यक्ती आदर्श म्हणून ठेवायची असेल तर आजच्या काळात फक्त शिवाजी महराज सापडतात. त्यांचं व्यक्तिगत जीवन आपला आदर्श आहे'.

मोहन भागवत पुढे म्हणाले, 'इस्लामिक आक्रमक हे सगळे वेगळे होते. ते परंपरा, धर्म , संस्कृती बदलायला लावतात, मारतात, लुटतात. मात्र, त्यांचा पराभव करण्याचा पहिला काळ हा शिवाजी महाराज यांचा होता. पहिला यशाचा प्रयोग त्यांनी केला. हे सगळ्यांना कळलं कधी तर तेव्हा ते आग्र्यातून सुटले. शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापनेचा एक वेगळा प्रयत्न केला. भारत टिकणार की नाही याकडे जगाचे लक्ष होते. त्याचा निकाल शिवाजी महाराजांच्या स्वराज्याने दिला. त्यावेळी सगळा समाज लढला. ज्यावेळी समाज लढतो ती शक्ती नेहमी विजयशाली असते'.

mohan bhagwat
देवेंद्र फडणवीसांचे नाव न घेता आदित्य ठाकरेंची टीका; म्हणाले, 'पुन्हा येईन म्हणणारे...'

'बाहेरून आलेला इस्लाम हा राजकीय जास्त दिसतो.त्या काळी अनेकदा हिंदू समाज एकत्र होवून लढला नाही. इस्लाम समाज जसा एक होऊन लढला तसा हिंदू समाज एक होऊन लढला नाही. आपला अहंकार वाढला आणि आपण सगळ गमावलं. साम्राज्यात सत्यम शिवम सुंदरम नांदलं पाहिजे ते खरे साम्राज्य', असेही भागवत म्हणाले.

'आजही दानवतेची मानवतेशी लढाई आहे. व्हिएतनाम चे लोक येतात तेव्हा ते म्हणतात रायगडावर जायचं. आपल साम्राज्य हे केवळ राज्यकर्त्यांचे नाही ते आपलं साम्राज्य आहे. ते आपल्या धर्माचं आपल्या संस्कृतीचं साम्राज्य आहे. हे पुस्तक म्हणजे भविष्यात उपयोगी पडेल असं पुस्तक आहे', असेही ते म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com