देवेंद्र फडणवीसांचे नाव न घेता आदित्य ठाकरेंची टीका; म्हणाले, 'पुन्हा येईन म्हणणारे...'

हिम्मत असती, मनगटात ताकद असती तर सुरतमध्ये जाऊन नव्हे, घरात बसून बंड केलं असतं.
Maharashtra Political Crisis
Maharashtra Political CrisisSaam TV

कर्जत : शिवसेना नेते तथा राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत आज कर्जतमध्ये शिवसेनेचा कार्यकर्ता मेळावा पार पडला या मेळाव्यात उपस्थितांना मार्गदर्शन करताना ठाकरे (Aditya Thackeray) यांनी बंडखोरांवर सडकून टीका केली. शिवाय पक्षातून घाण निघून गेल्याचा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला.

ते म्हणाले, 'तुम्ही कोणाच्या बाजूने उभे राहणार शिवसेनेच्या (shivsena) की फुटीरतावाद्यांच्या राहणार हे पाहण्यासाठी आलो आहे. घाण गेली हे बरं झालं पावसाळ्या पूर्वी नालेसफाई झाली, हे बरं. हे संकट म्हणून नाही तर संधी म्हणून पाहतो. कुरबुर सुरू झाली होती, आम्हाला याची माहिती होती. ठाण्याची दादागिरी तुम्हा लोकांची मन जिंकू नाही शकत. फुटीरतावाद्यांवर अंध विश्वास ठेवला ही चूक होते असं म्हणत त्यांनी बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर हल्लाबोल केला.

Maharashtra Political Crisis
आम्ही राज्यमंत्री नावालाच, अधिकार काहीच नव्हते; शंभूराज देसाईंचा घणाघात

ते म्हणाले, तपास यंत्रणेचा पुरेपूर वापर होतोय, सत्य तुमच्या बाजूने असतं तर बंड केलं नसतं. त्यांच्यात हिम्मत असती, मनगटात ताकद असती तर सुरतमध्ये जावून नव्हे, घरात बसून बंड केलं असतं. यांच्यात हिम्मत नाही म्हणून सुरतेला पळून गेले. एखादा आमदार बोलतोय, काय डोंगर, काय नदी, डोंगर आणि नदी पहायची तर आमच्या सह्याद्रीला या कर्जतला या असंही ठाकरे म्हणाले.

दरम्यान यावेळी त्यांनी नाव न घेता माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका केली, 'पुन्हा येईन, पुन्हा येईन म्हणणारे या मागे आहेत का? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. तसंच या प्रकरणामागे कोणीही असलं तरी महाराष्ट्र झुकणार नाही, कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा ? असं विचारलं तर गुवाहाटीला नेऊन ठेवला, असं म्हणत त्यांनी भाजपवर टीका केली.

हे देखील पाहा -

महाराष्ट्रातील माझा शेतकरी पेरणीसाठी खोळंबला आहे आणि कृषीमंत्री गुवाहाटीत, राज्यात दुष्काळ होता पाणीपुरवठा मंत्री गुवाहाटीत. मला काही ऐकू आलं आहे की आमदार दुपारी उशिरा उठतात, जिम करतात, जेवण करतात आणि झोपतात रात्री स्पेशल डान्सचा कार्यक्रम असतो. काही आहेत तिकडे सात वाजले की थरथरायला लागतात. आयपीएल मध्ये विक्री होते तशी यांनी स्वतः ची विक्री केली. मी पण वाट पाहत होतो, ऑफर येते का? पण माझ्यामध्ये हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं रक्त आहे.

दीपक केसरकर बाळासाहेब ठाकरे स्वर्गवासी झाल्यानंतर २ वर्षांनी शिवसेनेत आले आणि हे आम्हाला सांगतात ही बाळासाहेबांची शिवसेना राहिलेली नाही असा टोला त्यांनी केसरकरांना लगावला. फुटीरतावादी आमदार खोटे बोलतय ते आता शिवसेनेत राहू शकत नाहीत, तुमची लायकी नाही दुसरं कोणी शिवसेना बनवू शकत नाहीत. फसलेले परत येऊ शकतात यांना विधान भवनाची पायरी चढू देणार नाही असं आव्हानच त्यांनी बंडखोर आमदारांना दिलं आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com