- अभिजीत देशमुख
Kalyan-Dombivli Municipal Corporation News : कल्याण डोंबिवली महापालिकेत (Kalyan-Dombivli Municipal Corporation) समाविष्ट करण्यात आलेला सत्तावीस गावांमधील विविध समस्यांबाबत आज (गुरुवार) सर्व पक्षीय संघर्ष समितीने महापालिका मुख्यालयावर धरणे आंदोलन केले. या आंदोलनात शेकडो ग्रामस्थांनी सहभागी झाले आहेत. (Maharashtra News)
27 गावांमध्ये मालमत्ता करात केलेली वाढ रद्द करावी, 27 गावांची स्वतंत्र नगरपालिका करणे, ग्रोथ सेंटर रद्द करणे, भाल , भोपर गावातील डम्पिंग ग्राउंड रद्द करणे, आरोग्य व शिक्षण व्यवस्था सदृढ करणे अशा मागण्यासाठी हे आंदोलन (residents of 27 villages aandolan on kdmc against property tax and various issues) करण्यात आले. यावेळी या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय न घेतल्यास आंदोलन तीव्र करण्यात येईल असा इशारा संघर्ष समितीने दिला. दरम्यान या आंदोलनाकडे आमदार व लोकप्रतिनिधींनी पाठ फिरवल्याचे दिसून आले.
27 गावातील दहा पटीने वाढवण्यात आलेला मालमत्ता टॅक्स अत्यंत जुलमी टॅक्स आकारण्यात येतोय. महाराष्ट्रात कुठल्याच महापालिकेत अशा प्रकारचा टॅक्स नाही. त्यामुळे सत्तावीस गावातील जनता त्रस्त आहे. त्याचबरोबर मागच्या सरकारपासून आताच्या सरकार पर्यंत 27 गावांची वेगळी नगरपालिका करावी आमचे मागणी आहे.
27 गावातील आरोग्य सुविधा शिक्षण सुविधा सुदृढ करावी अशी मागणी देखील या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात येत असल्याचे संघर्ष समितीने सांगितले. तरी आंदोलनाकडे (aandolan) स्थानिक आमदार तसेच लोकप्रतिनिधींनी पाठ फिरवल्याचे दिसून आले.
हे सर्वपक्षीय आंदोलन आहे, कोणत्याही पक्षाचा झेंडा आंदोलनात नाही. या आंदोलनात कोणालाही वैयक्तिक निमंत्रण दिलेलं नाही. सोशल मीडियाच्या मार्फत सगळ्यांना आवाहन करण्यात आलं होतं. सगळ्यांनी सहभागी व्हावं हीच आमची इच्छा आहे. मात्र जे सहभागी होतील ते आमचे अन्यथा तो त्यांचा प्रश्न आहे. या मागण्या मान्य झाल्या तर ठीक अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल असा इशारा यावेळी संघर्ष समितीच्या वतीने गुलाब वझेंसह (संघर्ष समिती पदाधिकारी) आदींनी दिला.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.