- सचिन बनसाेडे
Shirdi News : साई संस्थानच्या (sai sansthan shirdi) दानपेटीतील नाण्यांमुळे बँका मेटाकुटीला आल्या आहेत. साईबाबांच्या दानपेटीत दर आठवठ्याला सरासरी ७ लाख तर वर्षाला साडेतीन कोटी रुपयांची नाणी जमा होतात. (Breaking Marathi News)
ही नाणी स्विकारणे बॅंकांना कठीण झाले आहे. त्यामुळे चार बॅंकांनी साई संस्थानची नाणी (ठेवी) स्विकारण्यास नकार (bank refuses to accept coins of shirdi sai sansthan) दिला आहे. त्यामुळे साई संस्थानच्या पुढे नवा पेच निर्माण झाला आहे.
शिर्डीतील १२ हून अधिक तर नाशिकच्या एका राष्ट्रीयकृत बँकेत साई संस्थानचे खाते आहे. प्रत्येक बँकेकडे दीड ते दोन कोटींची नाणी साठली आहे. नाण्यांच्या डोकेदुखीने चार बँकांनी यापुढे संस्थानच्या ठेवी स्वीकारण्यास असमर्थता दर्शवली आहे. परिणामी नाण्यांमुळे साई संस्थान पुढे एक नवा पेच निर्माण झाला आहे.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.