Republic Day 2025: प्रजासत्ताक दिनाच्या प्रेरणादायी पर्वावर, सायबर सुरक्षिततेचा निर्धार

Cyber Security Book: आजच्या डिजिटल युगात सायबर सुरक्षितता ही काळाची गरज आहे. देशाचा सायबर भविष्यास अधिक मजबूत करण्यासाठी 'सायबर सुरक्षा' या विषयावर विशेष पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले आहे.
Cyber Security Book: प्रजासत्ताक दिनाच्या प्रेरणादायी पर्वावर, सायबर सुरक्षिततेचा निर्धार
Republic Day 2025saam tv
Published On

26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन भारतीय मोठ्या उत्साहातक आणि आनंदात साजरा करतात. त्यात आनंदाची बातमी म्हणजे आज 'सायबर सुरक्षा जनजागृती मोहीम अभियान' अंतर्गत 'सायबर सुरक्षा पुस्तकाचे प्रकाशन' पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजीव चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले आहे. याचा फायदा डिजीटल उपकरणे वापरणाऱ्यांना मोठ्या प्रमाणात होणार आहे. जे लोक डिजिटल उपकरणांचा वापर करतात त्यांची फसवणूक सर्रास होत असते. त्यांच्यासाठी हे प्रकाशन फार महत्वाचे असणार आहे.

प्रजासत्ताक दिना निमित्ताने मुंबईच्या अंधेरी पूर्वेत एमआयडीसी पोलीस स्टेशन मध्ये पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आला. त्याचवेळेस सायबर गुन्हेगारापासून मुंबईकर वाचण्यासाठी एमआयडीसी पोलिसांकडून सायबर सुरक्षा जनजागृती मोहीम अभियान अंतर्गत सायबर सुरक्षा पुस्तकाचे प्रकाशन पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजीव चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला.

Cyber Security Book: प्रजासत्ताक दिनाच्या प्रेरणादायी पर्वावर, सायबर सुरक्षिततेचा निर्धार
Pune GBS News: पुणेकरांनो काळजी घ्या! मेंदू व्हायरसचा विळखा वाढतोय, १४ जण व्हेंटिलेटरवर, एकाचा मृत्यू

महाराष्ट्र राज्य सरकार यांनी जो काही सुप्रशासनासाठी शंभर दिवसाचा कार्यक्रम घोषित केलेला आहे त्या अंतर्गतच एक जनजागृती आणि सायबर अवेअरनेस हा प्रोग्राम हाती घेतला होता. जे काही सायबर गुन्हे आणि आपली जी काही फसवणूक करतात ते यापुस्तकातून लोकांपर्यंत जाणार आहे. मुळात फसवणुकीचे विविध प्रकार आहेत. एमआयडीसी पोलीस स्टेशनने हे सर्व फसवणुकीचे जे काही प्रकार आहेत ते या पुस्तिकेमध्ये सविस्तर सांगितले आहेत. एमआयडीसी पोलीस स्टेशन मार्फत या सायबर अवेअरनेस बाबत जनजागृती बाबत ही मोहीम राबवण्यात येत आहे.

आजच्या डिजिटल युगात सायबर सुरक्षितता ही काळाची गरज आहे. देशाचा सायबर भविष्यास अधिक मजबूत करण्यासाठी 'सायबर सुरक्षा' या विषयावर विशेष पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले आहे.या पुस्तकामधून नागरिकांना सायबर सुरक्षेबाबत जागरूकता, तांत्रिक मार्गदर्शन, आणि डिजिटल गुन्ह्यांपासून स्वतःचे संरक्षण कसे करावे याबाबत महत्त्वाची माहिती मिळेल.

सायबर फसवणुकी संदर्भात या पुस्तकामध्ये सर्व प्रकारची माहिती देण्यात आली आहे. कशाप्रकारे सायबर फसवणूक होतो प्रत्येक स्टेप सायबर पासून येते या पुस्तकामध्ये देण्यात आले आहे. या माहितीच्या अनुषंगाने लोकांमध्ये एक जनजागृती होईल आणि सायबर फसवणुकीपासून मुंबईकर वाचणार आहेत.

Cyber Security Book: प्रजासत्ताक दिनाच्या प्रेरणादायी पर्वावर, सायबर सुरक्षिततेचा निर्धार
Pune GBS News : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! मेंदू व्हायरसच्या रूग्णांवर होणार मोफत उपचार, अजित पवारांनी दिली माहिती

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com