महापुरात अवतरला 'स्पायडरमॅन', स्पायडरमॅन नागरिकांच्या मदतीला

Bhiwandi Floods: मुसळधार पावसानं अनेक ठिकाणी महापालिका प्रशासनाचे तीनतेरा वाजले आहेत. याला भिवंडी महापालिकाही अपवाद नाही. त्यामुळे पाण्यात अडकलेल्या नागरिकांच्या मदतीला थेट स्पायडरमॅन धावून आलाय. कोण आहे हा स्पायडरमॅन आणि हा कशी मदत करतोय ते पाहूयात....
A local youth dressed as Spiderman rescues stranded citizens during severe flooding in Bhiwandi after heavy rainfall.
A local youth dressed as Spiderman rescues stranded citizens during severe flooding in Bhiwandi after heavy rainfall.saam tv
Published On

मुंबईसह आसपासच्या शहरांत मुसळधार पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातलाय. कुठे रेल्वेसेवा विस्कळीत झालीये तर कुठे रस्त्यांना नद्यांचं स्वरुप प्राप्त झालंय. भिंवडीतही मुसळधार पावसामुळे नागरिकांची दाणादाण उडाली. मात्र, रस्त्यांवर साचलेलं पाणी आणि त्यातील खड्डे यातून वाट काढणाऱ्या भिंवडीकरांच्या मदतीला एक स्पायडमॅन धावून आलाय. त्यामुळे सगळीकडे या स्पायडरमॅनचीच चर्चा रंगलीय.

मुसळधार पावसात भिवंडीकरांची अडचण पाहून स्थानिक कंटेंट क्रिएटर शादाब मोमीन याने मदतीचा हात पुढे केला. थेट ‘स्पायडरमॅन’चा पोशाख परिधान करून तो रस्त्यावर उतरला आणि पुरात अडकलेल्या लोकांच्या मदतीला धावून आला. शादाबनं दोन लहान मुलांना आपल्या खांद्यावरून सुरक्षित नेलं. याशिवाय, पुरात अडकलेल्या वाहनांना पुढे जाण्यासाठी मदत देखील करतोय.

इतकंच नव्हे तर या स्पायडरमॅनने भिवंडी महानगरपालिका प्रशासनाच्या निष्क्रियतेवरही बोट ठेवलंय. एकीकडे, स्पायडरमॅनच्या वेषात असलेल्या शादाब मोमीनच्या संवेदनशीलतेचं सर्वत्र कौतुक होतंय. तर दुसरीकडे, स्थानिक महापालिका प्रशासनाच्या कारभारावर नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केलाय. दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नालेसफाई आणि रस्ते दुरुस्तीच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचे टेंडर काढले जातात. मात्र, पहिल्याच पावसात महापालिकेच्या दाव्यांची पोलखोल होते. त्यातच अशा पद्धतीने अडचणीच्या काळात नागरिकचं आपल्या मदतीला धावून येणार असतील तर कशाला हव्यात या कुचकामी यंत्रणा? असा सवाल उपस्थित होतोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com