Kalyan Politics: कल्याणमध्ये भाजप-शिवसेनेतील वादावर पडदा, श्रीकांत शिंदेंसाठी रवींद्र चव्हाणांची फिल्डिंग

Kalyan Political Latest News: रवींद्र चव्हाण यांच्या आवाहनामुळे डोंबिवलीमधील भाजप-शिंदे गटातील वादावर आता पडदा पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. कारण कल्याण लोकसभा मतदारसंघात भाजप-शिंदे गटात धुसफूस सुरू होती
Kalyan Political News
Kalyan Political NewsSaam tv
Published On

अभिजित देशमुख, कल्याण

Kalyna Latest News:

'खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा. त्यांना मतदान करून पुन्हा एकदा बलाढ्य मताने निवडून आणा. त्यांना नव्या संसदेत पाठवा, असे आवाहन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आयोजित एका विकास कामांच्या भूमिपूजनप्रसंगी केलं. रवींद्र चव्हाण यांच्या आवाहनामुळे डोंबिवलीमधील भाजप-शिंदे गटातील वादावर आता पडदा पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. (Latest Marathi News)

कल्याण लोकसभा मतदारसंघात भाजप-शिंदे गटात धुसफूस सुरू होती. दोन्ही बाजूचे कार्यकर्ते पदाधिकरी एकमेकांविरोधात आरोप प्रत्यारोप करत होते. त्यानंतर भाजप आणि खासदार श्रीकांत शिंदेंमध्ये खटके उडाले होते.

खासदार श्रीकांत शिंदे यांच्याबाबत सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी अप्रत्यक्षरित्या नाराजी व्यक्त केली होती. तर कल्याण पूर्व मतदार संघात भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी अनेकदा उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. भाजप वरिष्ठ नेत्यांच्या मध्यस्थी नंतरही भाजप आणि शिंदे गटात धुसफूस सूरु असल्याचे पाहायला मिळत होते. मात्र ही धुसफूस आता थांबल्याचे पाहायल मिळत आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Kalyan Political News
Narendra Modi: कोरोना काळात लोकांनी थाळीनाद का केला? PM नरेंद्र मोदींनी 'परीक्षा पे चर्चा' कार्यक्रमात सांगितलं कारण

रवींद्र चव्हाणांकड़ून खासदार शिंदेंचे कौतुक

काही दिवसांपूर्वी कल्याण पूर्वेत चक्की नाका परिसरातील कार्यक्रमात आमदार गणपत गायकवाड, खासदार श्रीकांत शिंदे एकत्र होते. तर डोंबिवलीत खासदार श्रीकांत शिंदे यांनी आयोजित केलेल्या दीपोत्सवात खासदार शिंदे यांच्यासोबत सार्वजनिक बांधकाममध्ये रवींद्र चव्हाण देखील उपस्थित होते. त्यानंतर कल्याण ग्रामीणमधील भोपर येथे आयोजित विकास कामाच्या भूमिपूजन कार्यक्रमात रवींद्र चव्हाण यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांचं कौतुक केलं

Kalyan Political News
Maharashtra Politics: मोठी बातमी! रोहित पवारांचा गुलाबराव पाटील यांच्याविरोधात १०० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा

रवींद्र चव्हाण नेमकं काय म्हणाले?

रवींद्र चव्हाण म्हणाले, लोकप्रिय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा. त्यांना मतदान करून बलाढ्य मताने निवडून आणा, आपण पुन्हा एकदा नवीन संसदेत पीएम नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान बनवण्यासाठी कटिबद्ध राहिलं पाहिजे. कल्याण ग्रामीणमधील पाण्याचा प्रश्न लवकरच मार्गी लावण्यासाठी आम्ही सर्व कटिबद्ध आहोत, असे सांगितले . रवींद्र चव्हाण यांच्या या वक्तव्यानंतर कल्याण लोकसभेमधील भाजप आणि शिवसेना शिंदे गटातील धुसफूस संपल्याचं दिसून येतंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com