सुशांत सावंत -
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या विरोधात आज भाजप आक्रमक झाली असून मलिकांचा सरकारने राजीनामा घ्यावा अशी जोराची मागणी त्यांनी लावून धरली आहे. आणि राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजपचे नेते राज्यभर पत्रकार परिषदा घेत आहेत. आणि याच पार्श्वभूमिवर भाजप नेते आशिष शेलारांनी (Ashish Shelar) आज मुंबईत घेतली यावेळी त्यांनी राज्य सरकारवर अनेक आरोप आणि टीका केल्या तसंच त्यांनी संजय राऊतांवर (Sanjay Raut) देखील टीका केली आहे.
ते म्हणाले, मलिकांबाबतच्या चौकशीला राज्य सरकार का थाबवू पाहत आहे? उद्धव ठाकरे यांची भूमिका बोटचेपी का आहे? मर्दाचे सरकार असणारे बोटचेपी भूमिका का घेत आहेत. या राज्यसरकारमध्ये प्राथमिकता कुठल्या विषयाला आणि न्यायिक भूमिका कोणती याचे तारतम्य नाही असे अनेक प्रश्न विचारत त्यांनी राज्य सरकावर आरोप केले.
दरम्यान, नवाब मलिक यांच्यावर अतिशय भयंकर आरोप झाले असून त्यांचा राजीनामा नाही त्याचे समर्थन, संजय राठोड आणि नवाब मलिक यात न्यायिक भूमिका कोणती? उद्धव ठाकरे सरकारने नवाब मलिक यांची हकालपट्टी केली नाही तर भाजप आंदोलन तीव्र करणार आणि राज्यातील जनतेला न्याय देऊ असा इशाराच शेलार यांनी दिला. यावेळीच त्यांनी संजय राऊतांवर टीका केली, संजय राऊत यांचे असं झालं आहे की, महेश मांजरेकर यांच्या 'नाय वरण भात लोन्चा कोण नाय कोन्चा' या सिनेमाप्रमाणे ट्रेलर मोठा पण पिक्चर फ्लॉप अशी टीका त्यांनी केली.
नाना पटोले सरकारमधील जोकर -
तसंच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी केलेल्या वक्तव्यावरती आपण सहमत नसल्याचंही ते यावेळी म्हणाले, तर यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांच्यावरील कारवाईबाबत बोलताना टक्केवारी, कट कमिशन, वसुली आता दृश्य स्वरूपात आली आहे याला मुंबईकर धडा शिकवतील असही ते म्हणाले. आणि नाना पटोले हे सरकारमधील जोकर आहेत. कोरोना काळात ज्यांनी लोकांसाठी काही केले नाही ते आता काय करणार असा टोला त्यांनी लगावला.
Edited By - Jagdish Patil
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.