'आमच्या राजांची प्रकृती ढासळली तरी दुर्लक्ष, मलिकांच्या पोटात दुखल्यावर आघाडीचे नेते पुढं'

'आमचे राजे काल उपोषणाला बसले त्यांच्याकडे लक्ष द्यायला उशीर पण नवाब मलिक यांच्यासाठी आघाडीचे नेते तातडीने उपोषणाला बसले.'
MVA Leader's
MVA Leader'sSaam TV
Published On

सुशांत सावंत -

मुंबई : आमच्या संभाजीराजे (SambhajiRaje) यांची प्रकृती ढासळली तिथे दुर्लक्ष आणि नवाब मलिक यांच्या पोटात दुखले तर सर्व लगेच पुढे गेले असं वक्तव्य आशिष शेलार यांनी केलं. राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते नवाब मलिक यांच्या विरोधात भाजप आक्रमक झाली असून मलिकांच्या राजीनाम्यासाठी पत्रकार परिषदा घेतल्या आहेत. आशिष शेलार (Ashish Shelar) यांनीही यासाठी मुंबईत पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांनी राज्य सरकारवर अनेक आरोप केले.

ते म्हणाले, मलिकांबाबतच्या (Nawab Malik) चौकशीला राज्य सरकार का थाबवू पाहत आहे? उद्धव ठाकरे यांची भूमिका बोटचेपी का आहे? मर्दाचे सरकार असणारे बोटचेपी भूमिका का घेत आहेत. या राज्यसरकारमध्ये प्राथमिकता कुठल्या विषयाला आणि न्यायिक भूमिका कोणती याचे तारतम्य नाही असे अनेक प्रश्न विचारत त्यांनी राज्य सरकावर आरोप केले.

दरम्यान, नवाब मलिक यांच्यावर अतिशय भयंकर आरोप झाले असून त्यांचा राजीनामा नाही त्याचे समर्थन, संजय राठोड आणि नवाब मलिक (Sanjay Rathore and Nawab Malik) यात न्यायिक भूमिका कोणती? आमचे राजे काल उपोषणाला बसले त्यांच्याकडे लक्ष द्यायला उशीर पण नवाब मलिक यांच्यासाठी नेते तातडीने उपोषणाला बसले संभाजीराजे यांची प्रकृती ढासळली तिथे दुर्लक्ष आणि नवाब मलिक यांच्या पोटात दुखले तर सर्व लगेच पुढे असंही शेलार म्हणाले.

तर भाजप तीव्र आंदोलन करेल -

MVA Leader's
'देशहितासाठी मुख्यमंत्र्यांनी पवारांच्या दबावापुढे झुकू नये; भाजप त्यांना समर्थन देईल'

हे राज्य आडनावावर चालत आहे का? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. इकबाल मिर्ची, हसीना पारकर, दाऊद ही नावे आल्यावर चौकशी संथ का? या लोकांनी पालिका उडवण्यासाठी रेखी केली यांनी मुंबई एक्स्चेंजची रेखी केली. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि सरकारने नवाब मलिक यांची हकालपट्टी केली नाही तर भाजप आंदोलन तीव्र करेल. आम्ही अजून व्यापक आंदोलन करू आणि राज्यातील जनतेला न्याय देऊ असा इशाराच शेलार यांनी दिला.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com