'त्या' महिलेची अशी प्रसूती तुम्ही कधीच ऐकली नसेल! ३ बाळांच्या जन्माने डॉक्टरही झाले चकित...

Mokhada Hospital : पालघरच्या मोखाडा उपजिल्हा रुग्णालयात आदिवासी महिलेची दुर्मिळ तिहेरी प्रसूती यशस्वी झाली. दोन मुली आणि एका मुलाचा जन्म झाला असून, दोन बाळे पायाळू स्थितीत असतानाही डॉक्टरांनी प्रसंगावधान राखत तिन्ही बाळांना सुखरूप जन्म दिला.
Mokhada Hospital
Mokhada Hospital
Published On

फय्याज शेख, साम टीव्ही प्रतिनिधी

ग्रामीण भागातील वैद्यकीय सुविधांवर अनेकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असताना, पालघर जिल्ह्यातील मोखाडा उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय क्षेत्राला अचंबित करणारी एक दुर्मिळ घटना घडली आहे. मोखाड्यासारख्या दुर्गम भागातील डॉक्टरांच्या कौशल्यामुळे एका आदिवासी महिलेची एकाच वेळी ३ जुळ्या बाळांची (तिहेरी) सुखरूप प्रसूती करण्यात यश आले आहे. पहिले बाळ सामान्य पद्धतीने जन्माला आल्यानंतर उर्वरित दोन बाळे ही अत्यंत जोखमीच्या 'पायाळू' (Breech position) स्थितीत होती; मात्र डॉक्टरांनी प्रसंगावधान राखून कोणतेही संकट ओढवू न देता दोन मुली आणि एका मुलाला सुखरूप जन्माला घातले.

मोखाडा उपजिल्हा रुग्णालयात एका आदिवासी गरोदर महिलेची एकाच वेळी ३ जुळ्या बालकांची सुखरूप प्रसूती करण्यात येथील डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना यश आले आहे. या तिहेरी प्रसूतीत दोन मुली आणि एका मुलाचा जन्म झाला असून, माता आणि तिन्ही नवजात बालके सुखरूप आहेत. ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणेच्या कार्यक्षमतेचे हे उत्तम उदाहरण ठरले आहे.

Mokhada Hospital
भाजप खासदारावर कोसळला दुःखाचा डोंगर! सख्ख्या भावाचे निधन, राजकीय विश्वावर शोककळा

जांभळाचापाडा (ता. मोखाडा) येथील रहिवासी असलेल्या संतोष गिरंधले या महिला दुसऱ्यांदा गरोदर होत्या. शनिवारी (दि. २२) दुपारी २:१० वाजता त्यांना मोखाडा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. रुग्णालयात तातडीने सोनोग्राफी केल्यानंतर महिलेच्या गर्भाशयात तीन बाळे असल्याचे डॉक्टरांच्या निदर्शनास आले.

Mokhada Hospital
'रागाने का पाहतोस?' म्हणून अडवले, अन् पुण्यात घडला भयंकर प्रकार, ८७ सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर धक्कादायक सत्य उघड

तज्ज्ञ डॉक्टरांचे अचूक नियोजन

सोनोग्राफीचा अहवाल येताच स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. भारतकुमार महाले यांना तातडीने माहिती देण्यात आली. डॉ. महाले यांच्या मार्गदर्शनाखाली अधिपरिचारक निलेश जानू भोरे यांनी अत्यंत कौशल्याने प्रसूतीची प्रक्रिया पार पाडली.

या प्रसूतीदरम्यान वैद्यकीय पथकासमोर मोठे आव्हान होते. पहिले बाळ सामान्य पद्धतीने जन्माला आले; मात्र त्यानंतर जन्मलेली इतर दोन बाळे ही 'पायाळू' स्थितीत (Breech position) होती. असे असतानाही वैद्यकीय पथकाने योग्य वेळी योग्य निर्णय घेत कोणतीही जोखीम न पत्करता तिन्ही बाळांची सुखरूप प्रसूती केली.

Mokhada Hospital
Pune Metro : पुणेकरांची प्रतिक्षा अखेर संपणार? हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोबाबत समोर आली सर्वात मोठी बातमी

अधिक उपचारासाठी एनआयसीयूमध्ये (NICU) दाखल

प्रसूतीनंतर माता व तिन्ही नवजात बालकांची प्रकृती स्थिर आहे. मात्र, बाळांचे वजन अपेक्षेपेक्षा कमी असल्याने त्यांना विशेष काळजी आणि नवजात अतिदक्षता उपचारांची (NICU) गरज होती. त्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी जव्हार येथील पतंगशाह कुटीर रुग्णालयातील नवजात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे.

मोखाडा उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय टीमने दाखवलेली तत्परता आणि अचूक निदानामुळेच ही गुंतागुंतीची तिहेरी प्रसूती यशस्वीपणे पार पडली असून, सर्वत्र या टीमचे कौतुक होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com