Raju Sapte Suicide Case गंगेश्वर श्रीवास्तवला दिंडोशी पोलिसांकडून अटक

दिंडोशी पोलिस गंगेश्वर श्रीवास्तला पिंपरी चिंचवडच्या वाकड पोलिसांच्याकस्टडीत देणार असल्याची माहिती समोर आली आहे.
Raju Sapte Suicide Case गंगेश्वर श्रीवास्तवला  दिंडोशी पोलिसांकडून अटक
Raju Sapte Suicide Case गंगेश्वर श्रीवास्तवला दिंडोशी पोलिसांकडून अटक
Published On: 

पिंपरी : प्रसिद्ध कला दिग्दर्शक राजू साप्ते यांच्या आत्महत्या प्रकरणी (Raju Sapte Suicide Case) गंगेश्वर उर्फ संजू भाई श्रीवास्तव याला मुंबई येथील दिंडोशी पोलिसांनी केली अटक केली आहे. दिंडोशी पोलिस गंगेश्वर श्रीवास्तला पिंपरी चिंचवडच्या वाकड पोलिसांच्याकस्टडीत देणार असल्याची माहिती समोर आली आहे. वाकड पोलिस करणार गंगेश्वर श्रीवास्तव याची पुढील चौकशी करणार आहेत.

हे देखील पहा-

दरम्यान या प्रकरणी गेल्या महिन्यात १५ जुलै रोजी वाकड पोलीसांनी मुख्य आरोपी राकेश मौर्यला पोलिसांनी अटक केली. राजू साप्ते यांनी त्यांच्या ताथवडे येथील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. याप्रकरणी त्यांच्या व्यायसायिक भागीदारांसह आणखी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी राजू साप्ते यांचे व्यावसायिक भागिदारांसह तिघांना अटक देखील केली. त्यानंतर साप्ते यांना धमकवणाऱ्या राकेशमौर्यला यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले.

Raju Sapte Suicide Case गंगेश्वर श्रीवास्तवला  दिंडोशी पोलिसांकडून अटक
तणाव आणि नैराश्य दूर करण्यासाठी 'या' आयुर्वेदिक औषधी वनस्पती गुणकारी

सोनाली राजेश साप्ते यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्यादीनंतर दिग्दर्शक राजू साप्ते यांच्या आत्महत्या प्रकरणी आतापर्यंत नरेश विश्वकर्मा (मिस्त्री),गंगेश्वर श्रीवास्तव (संजूभाई), अशोक दुबे, राकेश सत्यनारायण मौर्य, चंदन रामकृष्ण ठाकरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com