महाराष्ट्राच्या जनतेने खूप सहन केलं, आता लोकल चालू करा - राज ठाकरे

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारला पत्र लिहून मुंबई लोकल सुरु करा अन्यथा आंदोलन करु असा इशारा दिला आहे.
महाराष्ट्राच्या जनतेने खूप सहन केलं, आता लोकल चालू करा - राज ठाकरे
महाराष्ट्राच्या जनतेने खूप सहन केलं, आता लोकल चालू करा - राज ठाकरेSaam Tv News
Published On

कोरोना महामारीमुळे corona pandemic राज्य सरकारने अत्यावश्यक सेवा वगळता सर्वसामान्य जनतेसाठी मुंबईची लोकल सेवा mumbai local train बंद केली आहे. त्यामुळे जनतेला नाहक त्रास सहन करावा लागतोय. बस किंवा मिळेल त्या वाहनाने लोकांना प्रवास करावा लागतोय. यामुळे अनेकांची मोठी गैरसोय होतेय. हवे तिथे वेळेवर पोहोचता येत नाही, त्यामुळे मुंबईकरांची लाईफलाईन म्हणजे मुंबई लोकल लवकरात लवकर सुरु करण्यात यावी अशी मागणी होत असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे MNS cheif raj thackeray यांनी सरकारला पत्र लिहीलं आहे. raj thackeray writes letter to government for starting mumbai local train

आपल्या पत्रात राज ठाकरे म्हणाले की, देशाप्रमाणेच राज्यात गेल्या १५ महिन्यांपासून विविध निर्बंध आहेत. पण हे निर्बंध नक्की कुणासाठी आहे, असा प्रश्न पडतो. त्यात मुंबई शहरासाठी घेतलेले निर्णय अनाकलनीय असल्याचे राज ठाकरे म्हणाले. तसेच मुंबईतील जवळपास सर्व कार्यालये सुरु आहेत, मात्र लोकल बंद असल्याने बसमध्ये प्रचंड गर्दी होते. यामुळे हा रोग अधिक पसरण्याचा धोका आहे. त्यामुळे बस बंद अन् लोकल सुरु याने काय साध्य होणार असा सवालही राज ठाकरेंनी उपस्थित केला.

हे देखील पहा -

राज ठाकरे पुढे म्हणाले की, ही साथ एकाएकी जाणार नाही. त्यामुळे या साथीबरोबर रहाणं शिकलं पाहीजे, आणि याला धरुनच निर्णय घ्यायला हवेत असही ते म्हणाले. त्याचप्रमाणे ते म्हणाले सर्वसामान्य माणसाने खूप काही सहन केलंय, आता सरकारकडून सकारात्मक उपाय केले गेले नाही तर जनतेचा कडेलोट होईल. असा स्थितीत माझा पक्ष मुंबईकरांसोबत असेल, आम्ही तीव्र आंदोलन करु असा इशारा राज ठाकरेंनी सरकारला दिला आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com