Raj Thackeray
Raj ThackeraySaam TV

राज ठाकरे दोन दिवसीय पुणे दौऱ्यावर; औरंगाबादच्या सभेला पुण्यातून होणार रवाना

राज ठाकरे हनुमाल जयंतीनंतर प्रथमच पुण्यामध्ये (Pune) येत आहेत.
Published on

पुणे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) २९, ३० एप्रिल रोजी पुणे दौऱ्यावर असणार आहेत. औरंगाबादच्या सभेला राज ठाकरे पुण्यातून रवाना होणार आहेत. मनसेच्या पुणे शहर कोअर कमिटीची बैठक आज पार पडली. बैठकीत औरंगाबाद सभेच्या नियोजनावर चर्चा झाली. राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावरही बैठकीत चर्चा झाली आहे. ३ मे रोजी होणाऱ्या महाआरती संदर्भात देखील नियोजन झालेले आहे. महाआरतीसाठी परवानगी देण्यासाठी शहरातील पोलीस स्टेशनमध्ये पत्र देण्याचे काम सुरु आहे. मनसे शहर कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. राज ठाकरे हनुमान जयंतीनंतर प्रथमच पुण्यामध्ये (Pune) येत आहेत.

Raj Thackeray
मुंबई पोलिस आयुक्तांनी राणा दाम्पत्याचा चहा पितानाचा व्हिडिओ केला ट्वीट, म्हणाले...

१ मे रोजी राज ठाकरेंची औरंगाबादमध्ये सभा होणार आहे. त्याची घोषणा त्यांनी पुण्यातून केली होती. आगामी पुणे महापालिका निवडणूका डोळ्यासमोर ठेवून राज ठाकरेंचे पुणे दौरे महत्त्वाचे आहेत. राज ठाकरेंच्या गुढीपाडव्याच्या सभेनंतर मनसेचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते नाराज झाले होते. अनेकांनी पक्षाच्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर झालेल्या उत्तरसभेत राज ठाकरे आपल्या भूमिकेवर ठाम राहिले आणि मशिदीवरील भोंगे उतरवण्यासाठी सरकारला ३ मे पर्यंतचा अल्टीमेटम दिला आहे.

राज ठाकरेंनी पुण्यातून दोन घोषणा केल्या होत्या. पहिली म्हणजे १ मेला औरंगाबादला सभा आणि दुसरी म्हणजे अयोध्या दौरा. राज ठाकरेंच्या औरंगाबादमधील सभेला पोलीस प्रशासनाने अजून परवानगी दिलेली नाही. आगामी काळात अनेक महापालिकांच्या निवडणुका आहेत. त्यामुळे मनसेची मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. पुणे हा मनसेचा एकेकाळी बालेकिल्ला राहिला आहे. अनेक नगरसेवक निवडून आले होते. त्यामुळे पुन्हा एकदा पुण्यात पक्ष भक्कम करण्यासाठी राज ठाकरेंचे प्रयत्न सुरु आहेत.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com