Sharad Pawar Group : 'बुजुर्ग काकांनी उभा केलेला पक्ष...', राष्ट्रवादीबाबत निवडणूक आयोगाच्या निकालानंतर मनसेचं ट्वीट चर्चेत

MNS on Sharad Pawar Group : निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपल्या अधिकृत X अकाउंटवरुन केलेले एक ट्वीट सोशल मीडिआवर व्हायरल होत आहे.
MNS on NCP
MNS on NCPSaam tV
Published On

Mumbai News :

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुटीनंतर पक्ष आणि चिन्ह कुणाचं याबाबत निवडणूक आयोगाने ६ फेब्रुवारी रोजी निकाल दिला आहे. या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला देण्यात आलं आहे. या निकालावर राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपल्या अधिकृत X अकाउंटवरुन केलेले एक ट्वीट सोशल मीडिआवर व्हायरल होत आहे.

मनसेचा अधिकृत पेजवरून राज ठाकरे यांनी अजित पवार यांच्यावर रत्नागिरीतील सभेतून केलेला टीकेच्या व्हिडियो शेअर करण्यात आला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने अजित पवार यांच्या बाजूने निर्णय दिल्यानंतर मनसेने  अजित पवार यांच्यावर टीका केली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

MNS on NCP
Sharad Pawar Group: शरद पवार गटाला निवडावं लागेल नवीन चिन्ह, 'हे' आहेत चार पर्याय

ट्वीटमध्ये काय म्हटलंय?

मनसेने केलेल्या ट्वीटमध्ये म्हटलं की, 'बुजुर्ग काकांनी उभा केलेला पक्ष दुसऱ्याच्या बळावर हिसकावणं सोप्प आहे पण बुजुर्ग नेत्याचा अवमान न करता स्वतःच्या बळावर स्वतःचा पक्ष उभा करणं, चिन्ह मिळवणं ह्यासाठी 'राज ठाकरे' यांच्यासारखा संघर्ष आणि संयम लागतो, हिंमत लागते... असो, त्यांचं राजकारण त्यांना लखलाभ!' (Latest News)

MNS on NCP
Ajit Pawar Vs Sharad Pawar: अजित पवार गटाला चिन्ह आणि पक्ष कसं मिळालं? निवडणूक आयोगाने कोणत्या आधारे दिला निर्णय?

सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार

निवडणूक आयोगाने आपला निर्णय जाहीर केल्यानंतर  शरद पवार  गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलं की, निवडणूक आयोगाचा हा निर्णय धक्कादायक आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या हातातून पक्ष हिसकावून घेतला जातोय.

निकालाचा सविस्तर अभ्यास करुन आम्ही त्यावर भाष्य करू. या निकालाला आम्ही सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असून देशाचे सर्वोच्च न्यायालय आम्हाला न्याय देईल याची आम्हाला खात्री आहे, असं जयंत पाटील यांनी म्हटलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com