Sharad Pawar Group: शरद पवार गटाला निवडावं लागेल नवीन चिन्ह, 'हे' आहेत चार पर्याय

Sharad Pawar Group Symbol: आज निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी फुटीवर निकाल देत शरद पवार गटाला मोठा धक्का दिला आहे. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह हे अजित पवार यांना दिलं आहे.
Sharad Pawar Group Symbol
Sharad Pawar Group SymbolSaam Tv
Published On

Sharad Pawar Group Symbol:

आज निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी फुटीवर निकाल देत शरद पवार गटाला मोठा धक्का दिला आहे. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह हे अजित पवार यांना दिलं आहे. दरम्यान, आता शरद पवार गटाला आता स्वतंत्र मान्यता मिळाली आहे. शरद पवार गटाला उद्यापर्यंत निवडणूक आयोगाला नाव आणि चिन्ह कळवायचं आहे.

यातच उद्यापर्यंत शरद पवार गटाने याबाबत निवडणूक आयोगाला माहिती न कळवल्यास त्यांना अपक्ष म्हणून मान्यता देण्यात येईल, असं त्यांना सांगण्यात आल्याचं सूत्रांनी म्हटलं आहे. यातच चार चिन्ह शरद पवार गटाने निवडली असल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Sharad Pawar Group Symbol
NCP Party and Symbol: शरद पवार यांना मोठा धक्का, राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवारांकडे; निवडणूक आयोगाचा निर्णय

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शरद पवार गट उद्या नवीन पक्ष चिन्ह निवडू शकतो. यातच त्यांच्याकडे चार पर्याय आहे. ज्यातील दोन पर्यायांबद्दल सूत्रांनी साम टीव्हीला माहिती दिली आहे. शरद पवार गटाकडे उगवता सूर्य आणि चष्मा हे दोन चिन्ह निवडण्याचा पर्याय आहे. आता उद्या ते कोणते चिन्ह निवडतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. (Latest Marathi News)

निवडणूक आयोगाचा हा निकाल काय सांगतो?

दरम्यान, निवडणूक आयोगाने अजित पवारांचा पक्ष हाच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे अजित पवारांनाच नाव आणि चिन्ह वापरता येईल. शरद पवार गटाला स्वतंत्र गट म्हणून मान्यता मिळाली आहे. महाराष्ट्र राज्यातील ४१, नागालँडमधील ७ आमदार अजित पवारांकडे आहेत. तर लोकसभेचे दोन खासदार अजित पवारांकडे आहेत.

Sharad Pawar Group Symbol
Ajit Pawar Vs Sharad Pawar: अजित पवार गटाला चिन्ह आणि पक्ष कसं मिळालं? निवडणूक आयोगाने कोणत्या आधारे दिला निर्णय?

एका खासदाराने आणि महाराष्ट्रातील पाच आमदारांनी दोन्ही बाजूंनी प्रमाणपत्र दिले आहेत. राज्यसभा निवडणुकीसाठी शरद पवार गटाने नवे चिन्ह आणि पक्षाचे नाव सुचवावे लागणार आहे. उद्या ७ फेब्रुवारीला दुपारी ४ पर्यंत हे पर्याय द्यावेत, असं निवडणूक आयोगाने म्हटलं आहे. हे पर्याय वेळेत न दिल्यास शरद पवार गटाला अपक्ष म्हणून मान्यता मिळेल. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षांतर्गत निवडणुका लोकशाही मार्गाने न झाल्याचा ठपका आयोगाने ठेवला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com