सोमय्यांच्या देशविरोधी कृत्यापासून राजभवनाने दूर रहावे - राऊतांचा सल्ला

किरीट सोमय्या यांनी आयएनएस विक्रांतसाठी राज्यभरातून पैसे गोळा केले आहेत, असंही राऊत म्हणाले.
Sanjay Raut on Kirit Somaiya, Sanjay Raut Vs Kirit Somaiya News
Sanjay Raut on Kirit Somaiya, Sanjay Raut Vs Kirit Somaiya News Saam Tv
Published On: 

मुंबई: भाजप नेते किरीट सोमय्या आणि शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरुच आहेत. आज राऊत यांनी, सोमय्या त्यांच्या मुलासह फरार झाले असल्याचा आरोप केला आहे. किरीट सोमय्या राजभवनात बनावट कागदपत्रे तयार करुन बचावाचा प्रयत्न करीत आहेत. सोमय्या यांच्या देशविरोधी कृत्यापासून राजभवनाने दूर रहावे असा इशारा राऊत (Sanjay Raut) यांनी दिला आहे. (Sanjay Raut on Kirit Somaiya)

सोमय्या यांना वाचवण्यासाठी माफिया टोळीची राजभवनात ये-जा वाढली आहे. जुन्या तारखेची कागदपत्रे तयार करण्याचे काम सुरु आहे. राजभवनात बनावट कागदपत्रे तयार करुन सोमय्या यांना वाचवण्याचा प्रयत्न सुरु आहे. पण आमचा न्यायालयावर विश्वास आहे, असं राऊत म्हणाले.

Sanjay Raut on Kirit Somaiya, Sanjay Raut Vs Kirit Somaiya News
किरीट सोमय्या यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता; अटकपूर्व जामीनावर आज सुनावणी

आज माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. सोमय्या घाबरले आहेत, त्यामुळे ते आणि त्यांचा मुलगा फरार झाले आहेत. ते मेहुल चोक्सी जिथे लपला आहे तिथे तर गेले नाहीत याची भीती असल्याचे राऊत म्हणाले. आयएनएस विक्रांतचा घोटाळा मोठा आहे, गुन्ह्याची व्याप्ती मोठी आहे.

आयएनएस विक्रांतसाठी पैसे गोळा करण्यात आले ते पैसे राजभवनला भरले नसल्याचे समोर आले आहे, त्यामुळे हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला आहे. विक्रांतचा पैसा त्यांनी पीएमसी बँकेत गुंतवले असल्याचा आरोप राऊत (Sanjay Raut) यांनी यावेळी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com