Maharashtra Politics : राज ठाकरे-उद्धव ठाकरे युती होणार? राऊतांनी दिले युतीचे संकेत

Raj thackeray and uddhav thackeray : परदेश दौऱ्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या युतीची चर्चा रंगलीय.. त्यावर संजय राऊतांनी नेमकं काय म्हटलंय? ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने राज्यातील कोणते समीकरण बदलणार? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून
Raj and Uddhav Thackeray news
Raj and Uddhav ThackeraySaam Tv News
Published On

2006 मध्ये स्वतंत्र वाट निवडलेले ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेनं पुन्हा जोर धरलाय.. त्याला कारण ठरलंय राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना घातलेली साद आणि त्याला उद्धव ठाकरेंनी दिलेला प्रतिसाद....आता दोन्ही ठाकरे परदेश दौरा आटोपून आलेत.. त्यामुळे युतीची चर्चा कधी होणार? यावर संजय राऊतांनी ठाकरे गटाची भूमिका जाहीर केलीय.

Raj and Uddhav Thackeray news
Bob Cowper Death : क्रीडाविश्वावर शोककळा, दिग्गज क्रिकेटपटू काळाच्या पडद्याआड, टेस्टमध्ये ठोकलं होतं त्रिशतक

2006 मध्ये राज ठाकरेंनी शिवसेना सोडून मनसे स्थापन केली.. त्यानंतर अनेकदा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा रंगल्या होत्या...मात्र त्या चर्चा हवेतच विरल्या.. मात्र लोकसभेला जोरदार मुसंडी मारलेल्या ठाकरे गटाला विधानसभा निवडणुकीत मात्र मोठा फटका बसला.... तर राज ठाकरेंच्या मनसेला एकही जागा जिंकता आली नाही.. त्यामुळेच मुंबई महापालिका निवडणूक तोंडावर असताना दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याचा नारा दिलाय.... मात्र राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्यामागची कारणं काय आहेत? पाहूयात....

Raj and Uddhav Thackeray news
Pune Crime : पुणे हादरलं! भररस्त्यात रक्तरंजित थरार, मामा-भाच्यांनी तरुणीला संपवलं, CCTV आला समोर

विधानसभा निवडणुकीत मनसे आणि ठाकरे गटाचा दारुण पराभव

राज-उद्धव एकत्र आल्यास दोन्ही पक्षांना फायदा

शहरी भागात राज ठाकरेंना मानणारा वर्ग

आगामी महापालिका निवडणुकीत फायदा होऊ शकतो

ठाकरे बंधू एकत्र आल्यास मुंबई महापालिका राखणं शक्य होऊ शकतं

उद्धव ठाकरेंचं संघटनकौशल्य, राज ठाकरेंचं भाषण पक्षवाढीसाठी फायद्याचं

Raj and Uddhav Thackeray news
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना फक्त १५०० रुपये नाही, तर...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महत्वाचं बोलले

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर 6 महिन्यात महापालिका निवडणुका होणार हे स्पष्ट झालंय.. त्यामुळे सर्वच पक्ष कामाला लागले आहेत.. मात्र परदेश दौऱ्यानंतर युतीची बोलणी होण्याची अपेक्षा असताना ठाकरे बंधूंमध्ये चर्चा झाल्याचं समोर आलं नाही... त्यामुळे हिंदीसक्तीच्या मुद्द्यावर सरकारला धारेवर धरणाऱ्या ठाकरे बंधूंच्या युतीचं कधी ठरणार? ठाकरे बंधू युतीची बोलणी करणार की पुन्हा वेगवेगळी वाट चोखाळत स्वतंत्रपणे नशीब आजमावणार? याकडे राज्याचं लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com